किती गोड! अखेर भारती-हर्षने 'काजू'चा चेहरा सर्वांसमोर आणला, चाहत्यांनी दर्शवलं प्रेम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 11:13 IST2026-03-20T11:12:15+5:302026-03-20T11:13:48+5:30

भारती आणि हर्षच्या चाहत्यांची प्रतीक्षा आता संपली आहे, कारण या जोडीने अखेर त्यांचा धाकटा मुलगा 'काजू' म्हणजेच यशवीरचा चेहरा जगासमोर आणला आहे

actress bharti singh face reveal of his second son kaju harsh limbachiya | किती गोड! अखेर भारती-हर्षने 'काजू'चा चेहरा सर्वांसमोर आणला, चाहत्यांनी दर्शवलं प्रेम

किती गोड! अखेर भारती-हर्षने 'काजू'चा चेहरा सर्वांसमोर आणला, चाहत्यांनी दर्शवलं प्रेम

प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया सध्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. भारती आणि हर्षच्या चाहत्यांची प्रतीक्षा आता संपली आहे, कारण या जोडीने अखेर त्यांचा धाकटा मुलगा 'काजू' म्हणजेच यशवीरचा चेहरा जगासमोर आणला आहे. भारती सिंहने तिच्या अधिकृत यूट्यूब व्लॉगद्वारे मुलाचा चेहरा रिव्हील केला असून, याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

चाहत्यांची उत्सुकता संपली

भारती सिंहने गेल्या वर्षी आपल्या दुसऱ्या मुलाला जन्म दिला होता. तेव्हापासून ती अनेकदा व्लॉगमध्ये त्याची झलक दाखवत होती, पण भारतीने काजूचा चेहरा मात्र लपवून ठेवला होता. काजू कसा दिसतो हे पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक होते. अखेर एका विशेष व्लॉगमध्ये भारती आणि हर्षने काजूचा चेहरा सर्वांना दाखवला आहे. काजूचा चेहरा समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर कमेंट्सचा वर्षाव केला आहे.



अनेकांच्या मते, काजू हा त्याचा मोठा भाऊ 'गोला' (लक्ष) सारखाच दिसतो. एका युजरने कमेंट केली की, "काजू खूपच गोंडस आहे, कोणाची नजर न लागो." मुलाचा चेहरा सर्वांना दाखवण्यासाठी भारती आणि हर्षने एका खास पार्टीचे आयोजन केले होते. या सोहळ्यात केवळ जवळचे मित्र आणि नातेवाईक उपस्थित होते. भारती सिंहने २०१७ मध्ये हर्ष लिंबाचियाशी लग्न केले होते. त्यांना एप्रिल २०२२ मध्ये पहिला मुलगा 'गोला' झाला, तर आता धाकट्या मुलाच्या एन्ट्रीने त्यांचे कुटुंब पूर्ण झाले आहे.

Web Title : आख़िरकार! भारती और हर्ष ने 'काजू' का चेहरा दिखाया; प्रशंसकों ने बरसाया प्यार

Web Summary : भारती सिंह और हर्ष लिंबाचिया ने यूट्यूब पर अपने बेटे 'काजू' का चेहरा दिखाया, जिससे प्रशंसक खुश हो गए। दंपति ने पहले उनकी उपस्थिति को छिपा रखा था, जिससे बहुत प्रत्याशा पैदा हुई। कई प्रशंसकों ने काजू की अपने बड़े भाई 'गोला' से समानता पर टिप्पणी की। इस रहस्योद्घाटन का जश्न मनाने के लिए एक पार्टी आयोजित की गई।

Web Title : Finally! Bharti and Haarsh Reveal 'Kaju's' Face; Fans Shower Love

Web Summary : Bharti Singh and Haarsh Limbachiyaa revealed their son 'Kaju's' face on YouTube, delighting fans. The couple previously kept his appearance hidden, generating much anticipation. Many fans commented on Kaju's resemblance to his elder brother, 'Gola'. A party was held to celebrate the reveal.