४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार ही लोकप्रिय अभिनेत्री? नवराही आहे प्रसिद्ध कलाकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 17:21 IST2025-04-25T17:19:45+5:302025-04-25T17:21:39+5:30

४० व्या वर्षी अभिनेत्री दुसऱ्यांदा आई होणार असल्याची चर्चा आहे. याविषयी अभिनेत्रीने स्वतःच खुलासा केलाय. याशिवाय मुलगा हवा की मुलगी, याविषयीही इच्छा प्रकट केली आहे

actress bharti singh becoming a mother for the second time at the age of 40 husband harsh limbachiya | ४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार ही लोकप्रिय अभिनेत्री? नवराही आहे प्रसिद्ध कलाकार

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार ही लोकप्रिय अभिनेत्री? नवराही आहे प्रसिद्ध कलाकार

विनोदी अभिनेत्री आणि कॉमेडीयन भारती सिंगची (bharti singh) चांगलीच चर्चा असते. भारतीला आपण विविध शोमध्ये लोकांना हसवताना बघितलंय. भारती आणि तिचा पती हर्ष लिम्बाचिया या दोघांची जोडी अनेकांना आवडते. भारती आणि हर्ष या दोघांनी २०१७ ला एकमेकांशी लग्न केलं होतं. पुढे २०२२ ला त्यांनी एका मुलाला जन्म दिला. या मुलाचं नाव त्यांनी लक्ष्य ठेवलं असून ते त्याला प्रेमाने 'गोला' म्हणून हाक मारतात. अशातच वयाच्या ४० व्या वर्षी भारती सिंग पुन्हा आई होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. याविषयी भारती काय म्हणाली बघा

भारती पुन्हा होणार आई?

भारती सिंग तिच्या यूट्यूब व्हिडीओमधून तिच्या दैनंदिन आयुष्याबद्दलचे अपडेट्स लोकांपर्यंत शेअर करत असते. त्यावेळी भारतीच्या एका चाहत्याने "तू पुन्हा आई होणार आहेस का?" असं विचारलं. त्यावेळी भारतीने उत्तर दिलं की, "सध्या मी गरोदर नाही. परंतु २०२५ मध्ये मी एका मुलीला जन्म देऊ इच्छिते. गोला आता ३ वर्षांचा झाला आहे. हीच योग्य वेळ आहे. तुम्ही सर्वजण प्रार्थना करा की, मी लवकरच मी एका मुलीची किंवा मुलाची आई होईल", अशाप्रकारे भारतीने खुलासा केला.


भारतीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर ती सध्या 'लाफ्टर शेफ' सीझन दोनचं होस्टिंग करत आहे. तर तिचा पती हर्ष सध्या 'सुपरस्टार सिंगर' कार्यक्रमाचं होस्टिंग करताना दिसतोय. भारती आणि हर्ष या दोघांनी अनेक कार्यक्रमांचं एकत्र होस्टिंगही केलं. भारती आणि हर्ष या दोघांनी कायमच एकमेकांच्या करिअरला सपोर्ट केला आहे. आता भारतीने सर्वांसमोर यावर्षी आई होणार असल्याची इच्छा प्रकट केल्यामुळे भारती-हर्ष पुन्हा आई-बाबा होणार का, हा उत्सुकतेचा विषय आहे.

Web Title: actress bharti singh becoming a mother for the second time at the age of 40 husband harsh limbachiya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.