फाटक्या कपड्यांमध्ये रस्त्यावर फिरताना दिसला हा अभिनेता, त्याला ओळखणंदेखील झालंय कठीण
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2021 18:04 IST2021-12-25T18:04:11+5:302021-12-25T18:04:36+5:30
या अभिनेत्याचा रस्त्यावर बिकट अवस्थेत फिरतानाचा व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे.

फाटक्या कपड्यांमध्ये रस्त्यावर फिरताना दिसला हा अभिनेता, त्याला ओळखणंदेखील झालंय कठीण
हिंदी टेलिव्हिजनवरील विनोदी कलाकारांपैकी किकू शारदा (Kiku Sharda)हा एक कलाकार आहे. सध्या तो 'द कपिल शर्मा शो' (The Kapil Sharma Show)मध्ये दिसत आहे. किकू शारदा छोट्या पडद्यावर प्रेक्षकांना खळखळून हसवतो. किकू शारदा कपिल शर्माच्या शोमध्ये विविध व्यक्तिरेखा साकारताना दिसत आहे. त्याने साकारलेली प्रत्येक व्यक्तीरेखा प्रेक्षकांना खूप भावते. दरम्यान, किकू शारदाचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये त्याला ओळखणे कठीण झाले आहे.
समोर आलेल्या व्हिडिओत किकू शारदा खूपच वयस्कर दिसत आहे. त्याच्या डोक्यावरचे केस पांढरे होऊन पडत आहेत. त्याचे कपडेही फाटलेले दिसत असून तो चप्पल घालून रस्त्याने चालताना दिसतो आहे. किकू शारदाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
किकू शारदा पापाराझींसमोर फोटोसाठी पोज देताना दिसतो आहे. एका फोटोग्राफरने त्याला विचारले की, सर, तुमची अशी अवस्था कशी झाली? त्यावर किकू शारदा म्हणाला की, 'यार काय सांगू? इकडे खूप समस्या सुरू आहेत. माझे सर्व सामान विकले गेले आहे. त्यावर फोटोग्राफर म्हणतोय की, सर, आज नोरा फतेही येणार आहे, मग तुम्ही तरुण व्हाल. नंतर किकू शारदा म्हणताना दिसतोय की, आज मी पूर्ण जोमात असेन. त्यानंतर तो हसत निघून जातो.