Video: रस्त्याच्या बाजूला हँडपंपवर कपडे धुताना दिसला प्रसिद्ध अभिनेता, झालीये अशी अवस्था
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 16:05 IST2026-02-19T16:04:11+5:302026-02-19T16:05:15+5:30
सध्या अशाच एका अभिनेत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेता रस्त्याच्या कडेला असलेल्या हँडपंपवर कपडे धुताना दिसत आहे. अभिनेत्यावर ही वेळ का आली? आणि त्याची अशी अवस्था का झालीये? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

Video: रस्त्याच्या बाजूला हँडपंपवर कपडे धुताना दिसला प्रसिद्ध अभिनेता, झालीये अशी अवस्था
कलाविश्वातील सेलिब्रिटींचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. सध्या अशाच एका अभिनेत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेता रस्त्याच्या कडेला असलेल्या हँडपंपवर कपडे धुताना दिसत आहे. अभिनेत्यावर ही वेळ का आली? आणि त्याची अशी अवस्था का झालीये? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.
व्हिडीओत दिसणारा हा अभिनेता म्हणजे सुनील ग्रोव्हर आहे. सुनील ग्रोव्हरने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत तो हँडपंपवर स्वत: पाणी काढताना दिसत आहे. त्यानंतर बादलीत कपडेही धुताना सुनील ग्रोव्हर दिसत आहे. कोणतंही कॅप्शन न देता हा व्हिडीओ त्याने शेअर केला आहे. रस्त्यावर कपडे धुण्याची वेळ सुनील ग्रोव्हरवर का आली? असा प्रश्न चाहते विचारत आहेत. पण खरं तर सुनील ग्रोव्हर असे मजेशीर व्हिडीओ करत असतो.
याआधीही त्याने मार्केटमध्ये भाजी विकण्याचा, मक्याचे कणीस विकण्याचा, धाब्यावर भाकरी बनवण्याचा असे अनेक मजेशीर व्हिडीओ सुनील ग्रोव्हर शेअर करतो. सुनील ग्रोव्हर हा कॉमेडी अभिनेता आहे. द कपिल शर्मा शोने त्याला प्रसिद्धी मिळवून दिली. या शोमधील त्याची गुथ्थी ही भूमिका गाजली होती. काही सिनेमांमध्येही तो दिसला आहे.