'बिग बॉस मराठी ६'मध्ये आता लागणार विनोदाचा तडका, अभिनेता सागर कारंडेची घरात शानदार एन्ट्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2026 20:42 IST2026-01-11T20:41:16+5:302026-01-11T20:42:48+5:30
चला हवा येऊ द्या फेम सागर कारंडेने बिग बॉस मराठी ६ मध्ये एन्ट्री झाली आहे. सर्वांची उत्सुकता यामुळे वाढली आहे

'बिग बॉस मराठी ६'मध्ये आता लागणार विनोदाचा तडका, अभिनेता सागर कारंडेची घरात शानदार एन्ट्री
'बिग बॉस मराठी ६'चा ग्रँड प्रिमिअर कलर्स मराठीवर सुरु आहे. सर्वांना या नव्या सीझनची गेल्या अनेक दिवसांपासून उत्सुकता होती. अशातच 'बिग बॉस मराठी ६' मध्ये स्पर्धक म्हणून कोण कोण दिसणार याकडे सर्वांचं लक्ष होतं. अशातच या नव्या सीझनमध्ये अभिनेता सागर कारंडे सहभागी झाला आहे. सागरच्या खास एन्ट्रीने प्रेक्षकांमध्ये या नव्या सीझनविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.
चला हवा येऊ द्याच्या माध्यमातून सागर कारंडेने प्रेक्षकांचं मन जिंकलंय. सागर कारंडेची घरात आल्याआल्या अभिनेत्री दिपाली सय्यदसोबत गट्टी जमली आहे. सागर कारंडेने आता बिग बॉस मराठी ६ मध्ये कशी कमाल करतो याकडे सर्वांचं लक्ष आहे. सागर कारंडेच्या एन्ट्रीने त्याच्या चाहत्यांना आनंद झाला आहे. चला हवा येऊ द्या गाजवणारा सागर बिग बॉससारख्या घरात कसा खेळ करणार, याची सर्वांना उत्सुकता आहे.