Bigg boss OTT: अरे देवा! ऑन कॅमेरा स्पर्धकांनी केलं लीपलॉक; व्हिडीओ होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2023 09:21 IST2023-06-30T09:19:04+5:302023-06-30T09:21:00+5:30

Bigg boss ott 2: या व्हिडीओमध्ये या कार्यक्रमात सहभागी झालेल्या दोन स्पर्धकांनी चक्क ऑन कॅमेरा लीपलॉक केलं आहे.

actor jad hadid and akanksha puri kissed each other in bigg boss ott 2 show | Bigg boss OTT: अरे देवा! ऑन कॅमेरा स्पर्धकांनी केलं लीपलॉक; व्हिडीओ होतोय व्हायरल

Bigg boss OTT: अरे देवा! ऑन कॅमेरा स्पर्धकांनी केलं लीपलॉक; व्हिडीओ होतोय व्हायरल

प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय असलेला कार्यक्रम म्हणजे बिग बॉस ओटीटी (Bigg Boss OTT). नुकतंच या शोचं दुसरं पर्व सुरु झालं आहे. विशेष म्हणजे यंदाचं हे पर्व सुरु झाल्यापासून सातत्याने या ना त्या कारणाने चर्चेत येत आहे. या कार्यक्रमाची सुरुवात स्पर्धकांमधील जोरदार भांडणाने झाली. मात्र, आता या घरात प्रेमाचे वारे वाहू लागले आहेत.

सध्या सोशल मीडियावर या घरातील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये या कार्यक्रमात सहभागी झालेल्या दोन स्पर्धकांनी चक्क ऑन कॅमेरा लीपलॉक केलं आहे. त्यामुळे हा व्हिडीओ पाहून अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत. एका टास्क दरम्यान अभिनेता जैद हदीद आणि अभिनेत्री आकांक्षा पुरी यांनी लीप लॉक केलं आहे. विशेष म्हणजे ही जोडी बराच वेळ एकमेकांना किस करत होती. त्यामुळे प्रेक्षकांसह घरातील सदस्यांनीही भुवया उंचावल्या आहेत.

Bigg Boss OTT: 'तुझा नवरा, सासू...घरच्या गोष्टी घरी ठेव '; सहानभुती मिळवणाऱ्या आलियाला सलमानचा दणका

नेमकं काय आहे प्रकरण?

बिग बॉस ओटीटीच्या घरात असलेला स्पर्धक अविनाश सचदेव याने जैद आणि आकांक्षा यांना एक चॅलेंज दिलं. या चॅलेंजमध्ये या दोघांनी जवळपास ३० सेकंद एकमेकांना सगळ्यांसमोर किस करायचं होतं. त्यामुळे हे चॅलेंज दोघांनीही स्वीकारलं. विशेष म्हणजे त्यांना किस करताना घरातले सगळेच अचंबित झाले. इतकंच नाही तर शेवटी, आता तुमचं हे चॅलेंज थांबवा, असं घरातील स्पर्धकांना या दोघांना सांगावं लागलं.

'महेश भट्टसोबत लग्न केल्याचा सोनी राजदानला झाला होता पश्चाताप'; पूजा भट्टचा खुलासा

दरम्यान, सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत असून अनेकांनी या कार्यक्रमावर टीका केली आहे. इतकंच नाह तर या शोला आता बिग बॉस ओटीटी अॅ़डल्ड शो असं ना द्यावं असं म्हणत अनेकांनी ट्रोल केलं आहे.

Web Title: actor jad hadid and akanksha puri kissed each other in bigg boss ott 2 show