दयाबेनला विसरा, आता 'तारक मेहता...' मधील 'हा' लोकप्रिय अभिनेता ४ वर्षांनी पुन्हा मालिकेत परतणार? व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 12:59 IST2025-10-10T12:28:59+5:302025-10-10T12:59:57+5:30
'तारक मेहता...' मधील 'हा' लोकप्रिय अभिनेता ४ वर्षांनी पुन्हा करतोय मालिकेत कमबॅक? चाहत्यांची उत्सुकता शिगेला. कोण आहे हा अभिनेता? जाणून घ्या

दयाबेनला विसरा, आता 'तारक मेहता...' मधील 'हा' लोकप्रिय अभिनेता ४ वर्षांनी पुन्हा मालिकेत परतणार? व्हिडीओ व्हायरल
गेली अनेक वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी मालिका म्हणजे 'तारक मेहता का उल्टा चष्मा'. ही लोकप्रिय मालिका सोडून गेलेला एक कलाकार तब्बल ४ वर्षांनी पुन्हा मालिकेत कमबॅक करतोय. त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अनेकांना वाटलं असेल दयाबेन फेम अभिनेत्री दिशा वाकानी मालिकेत कमबॅक करणार का? पण असं नाहीये. कोण आहे हा अभिनेता? जाणून घ्या
हा अभिनेता 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये परतणार?
'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेत 'सोढी' ही भूमिका साकारणारा अभिनेता गुरुचरण सिंग या मालिकेत कमबॅक करत असल्याची चर्चा आहे. गुरुचरण सिंगने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तो म्हणतो की, "मी बऱ्याच दिवसांनी तुमच्या समोर आलो आहे. बाबाजींनी माझी प्रार्थना ऐकली आहे. माझ्या कुटुंबाची आणि तुम्हा सर्व चाहत्यांची प्रार्थना त्यांनी ऐकली. माझ्याकडे एक खूप मोठी आणि चांगली बातमी आहे, जी मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तुम्ही माझ्यासाठी केलेल्या प्रार्थना मी कधीही विसरणार नाही." गुरुचरणने हा व्हिडीओ शेअर करताच त्याच्या चाहत्यांमध्ये 'तो शोमध्ये परत कमबॅक करतोय का', अशी चर्चा रंगली आहे.
जवळपास चार वर्षांपासून अभिनय क्षेत्रापासून दूर असलेला गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता होण्याच्या बातमीने दोन वर्षांपूर्वी मोठी खळबळ उडवली होती. त्यानंतर तो घरी परतला आणि त्याने आपल्या आर्थिक अडचणींबद्दल खुलासा केला होता.
चाहत्यांची उत्सुकता शिगेला
गुरुचरण सिंग नेमकी कोणती बातमी देणार हे गुलदस्त्यात असलं तरीही, त्याच्या या व्हिडिओमुळे चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झाले आहे. "तुम्ही 'तारक मेहता' शोमध्ये परत येत आहात का? आमच्यासाठी यापेक्षा मोठी 'गुड न्यूज' दुसरी कोणतीच नसेल.", "लवकर परत या 'तारक मेहता'मध्ये, आता पूर्वीसारखी मजा येत नाहीये.", अशा कमेंट करुन चाहत्यांनी गुरुचरण यांच्या कमबॅकबद्दल उत्सुकता दर्शवली आहे
गुरुचरण सिंग यांनी यापूर्वी एका मुलाखतीत तारक मेहता...चे निर्माते असित मोदी यांच्याकडे प्रोडक्शन टीममध्ये काम करण्याची मागणी केली होती. आता त्यांची ही मोठी बातमी अभिनय क्षेत्रातील त्यांचं वेगळं पुनरागमन आहे की 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मध्ये त्यांची धमाकेदार एंट्री आहे, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.