मिहीर म्हणून मिळाली लोकप्रियता, एका चुकीमुळे खराब झालं करिअर, अभिनेत्याचा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 13:51 IST2025-10-17T13:50:54+5:302025-10-17T13:51:33+5:30
आज असं झालं असतं तर मी ती मालिका कधीच सोडली नसती...असं का म्हणाला अभिनेता?

मिहीर म्हणून मिळाली लोकप्रियता, एका चुकीमुळे खराब झालं करिअर, अभिनेत्याचा खुलासा
'क्योंकी सास भी कभी बहू थी' मालिकेतील मिहीर या भूमिकेमुळे प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता अमर उपाध्याय. या भूमिकेमुळे तो रातोरात स्टार झाला होता. त्याची झलक पाहण्यासाठी महिला अक्षरश: आतुर असायच्या. गेल्या तीन दशकांपासून तो टेलिव्हिजनवर काम करत आहे. मात्र आजही त्याला असंच वाटतं की त्याने नुकतीच करिअरची सुरुवात केली आहे. एका चुकीमुळे आपलं करिअर खराब झाल्याचं अमरने आता सांगितलं.
'हिंदुस्तान टाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीत अमर उपाध्याय म्हणालेला, "मी माझ्या करिअरमध्ये अनेक चुकीचे निर्णय घेतले. ज्याचा परिणाम माझ्या वाईट झाला. पहिली गोष्ट तर क्योकी सांस भी कभी बहु थी मालिका मी सोडायला नको होती. त्या वेळी माझ्यासाठी बरंच काम होतं. मला अनेक ऑफर्स होत्या. ३ सिनेमे, ६ प्रोजेक्ट्समध्ये मी मुख्य भूमिकेत होतो. मी खूपच लालची आर्टिस्ट झालो होतो. इतका लालचीपणा बरा नाही हे मला तेव्हा कळलंच नाही. आज असं झालं असतं तर मी ती मालिका कधीच सोडली नसती आणि इतर प्रोजेक्ट्सला वाट बघायला सांगितलं असतं."
अमर उपाध्यायने २००३ साली 'दहशत' या सिनेमातून हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. यानंतर त्याने 'धुंध: द फॉग', 'एलओसी कारगिल' आणि '१३ बी' या सिनेमांमध्येही तो दिसला. मात्र त्याला कोणत्याही सिनेमातून फारशी ओळख मिळवता आली नाही. अमरने १९९९ साली हेतलशी लग्न केलं. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे.