लाडक्या बहिणीच्या केळवणासाठी अभिषेकचा कॉन्टिनेंटल बेत, अमृताने शेअर केला खास व्हिडिओ, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2023 13:46 IST2023-11-07T13:43:22+5:302023-11-07T13:46:31+5:30

"अभिषेक आणि कृतिकाने कॉन्टिनेटल केळवण बनवून दिलाय आम्हाला पास्ता...", अमृताने प्रसादसाठी घेतला हटके उखाणा

abhishek deshmukh made continental food for amruta deshmukh and prasad jawade kelvan video | लाडक्या बहिणीच्या केळवणासाठी अभिषेकचा कॉन्टिनेंटल बेत, अमृताने शेअर केला खास व्हिडिओ, म्हणाली...

लाडक्या बहिणीच्या केळवणासाठी अभिषेकचा कॉन्टिनेंटल बेत, अमृताने शेअर केला खास व्हिडिओ, म्हणाली...

मराठी कलाविश्वातील कलाकारांची लगीनघाई सुरू आहे. काही महिन्यांपूर्वीच अमृता देशमुख आणि प्रसाद जवादेने प्रेमाची कबुली दिली होती. त्यानंतर त्यांनी साखरपुडाही उरकला होता. आता ते लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. दोघांच्याही घरी लग्नाची जय्यत तयारी सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच देशमुख कुटुंबीयांनी अमृता आणि प्रसादचं केळवण केलं होतं. पण अभिषेक आणि कृतिका काही कारणांमुळे या केळवणाला उपस्थित राहू शकले नव्हते. आता अभिषेकने लाडक्या बहिणीचं केळवण केलं आहे. 

अमृताने तिच्या इन्स्टाग्रामवरुन याचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. अमृता आणि प्रसादच्या केळवणासाठी अभिषेक-कृतिकाने खास कॉन्टिनेंटल पदार्थांचा बेत केला होता. पास्ता, गार्लिक ब्रेड असा बेत या केळवणासाठी केला होता. अमृता-प्रसादच्या केळवणासाठी खास सजावटीही त्यांनी केली होती. अमृताने शेअर केलेल्या या व्हिडिओत त्याची झलक पाहायला मिळत आहे. अमृताने प्रसादसाठी खास उखाणाही घेतला. "अभिषेक आणि कृतिकाने कॉन्टिनेटल केळवण बनवून दिलाय आम्हाला पास्ता, संसार सुरू झालाय वाटतं कारण प्रसादचं नाव घेते खातोय आम्ही खस्ता", असा उखाणा अमृताने घेतला. 

प्रसाद आणि अमृता 'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या पर्वात सहभागी झाले होते. 'बिग बॉस'च्या घरातच त्यांच्यातील प्रेमसंबंध खुलले होते. घरातून बाहेर आल्यानंतर काही महिन्यांनी अमृता-प्रसादने प्रेमाची कबुली देत लग्न करत असल्याचं सांगितलं होतं. १८ नोव्हेंबरला ते दोघेही लग्नबंधनात अडकणार आहेत. 

Web Title: abhishek deshmukh made continental food for amruta deshmukh and prasad jawade kelvan video