अभिजीत खांडकेकरच्या पत्नीने शेअर केली रोमँटिक पोस्ट, तीदेखील आहे प्रसिद्ध अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2022 11:59 IST2022-02-02T11:59:06+5:302022-02-02T11:59:34+5:30

माझ्या नवऱ्याची बायको फेम अभिनेता अभिजीत खांडकेकर (Abhijeet Khandkekar) हा त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर बराच अ‍ॅक्टिव्ह असतो.

Abhijeet Khandkekar's wife shared a romantic post, she is also a famous actress | अभिजीत खांडकेकरच्या पत्नीने शेअर केली रोमँटिक पोस्ट, तीदेखील आहे प्रसिद्ध अभिनेत्री

अभिजीत खांडकेकरच्या पत्नीने शेअर केली रोमँटिक पोस्ट, तीदेखील आहे प्रसिद्ध अभिनेत्री

माझ्या नवऱ्याची बायको फेम अभिनेता अभिजीत खांडकेकर (Abhijeet Khandkekar) हा त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर बराच अ‍ॅक्टिव्ह असतो. त्याची पत्नी सुखदा खांडकेकर ही सुद्धा अभिनेत्री आहे. हे दोघे एकमेकांसोबतचे रोमॅण्टिक फोटो अनेकदा सोशल मीडियावर शेअर करत असतात. त्यांच्या या फोटोवर चाहते भरभरुन लाईक्स आणि कमेंट्स करत असतात. नुकतेच या दोघांच्या लग्नाला नऊ वर्ष झाली आहेत. यानिमित्ताने सुखदाने अभिजीतसाठी एक खास पोस्ट शेअर केलीये. तिने लग्नातला फोटो शेअर करत म्हटले आहे की, तुला नवव्या वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...अंकशास्त्रात, नऊ अंक हा पूर्णत्व दर्शवतो. कारण तो एकल-अंकी संख्यांचा शेवटचा अंक आणि मूल्यात सर्वोच्च अंक आहे. हा एकमेकांसोबतच्या अनुभवाचा सर्वोच्च बिंदू आहे. एकीकडे एकेरी वर्ष मोजक्याचा शेवट होत आहे तर दुसरीकडे दोन अंकी वर्षांची नवी सुरुवात होत आहे... मी या सगळ्याशी मेळ खातेय. शेवटचा आनंद घेण्यासाठी आणि नवीन सुरुवात करण्यासाठी खूप उत्साही आहे...लव्ह यू अभि... 

पत्नीच्या हटके पोस्टवर अभिजीतने निव्वळ प्रेम असं म्हटलंय...तर अभिजीतने देखील पत्नी सोबतचा फोटो शेअर करत तिला विश केलंय...शेअर केलेल्या फोटोला त्यानं कॅप्शन दिलीये की, आपल्या लग्नाला आज 9 वर्ष पूर्ण झाली आहेत. आणखी मोठा पल्ला गाठायचा आहे. कायम माझ्यासोबत राहण्यासाठी थँक्यू.... यासोबतच इंडस्ट्रीतील त्यांच्या मित्र मैत्रिणींदेखील त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. 

अभिजीतने 1 फेब्रुवारी 2013 रोजी सुखदासोबत लग्नगाठ बांधली होती. या दोघांचे लव्ह मॅरेज आहे. एका फेसबुक मॅसेजमुळे त्यांच्या दोघांत मैत्री झाली...नाशिकचा मुलगा मालिकांत काम करणार असल्याने सुखदाला कौतुक वाटले आणि तिने अभिजीतला मॅसेज केला. यानंतर दोघांमध्ये बोलणे सुरु झाले आणि काही दिवसांच्या मैत्रीनंतर अभिजीतने सुखदाला लग्नासाठी विचारले.

 

Web Title: Abhijeet Khandkekar's wife shared a romantic post, she is also a famous actress