Bigg Boss Marathi 2: अभिजीत बिचुकलेची पत्नी दिसतेय इतकी सुंदर, पहिल्यांदाच समोर आला Family Photo
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2019 14:53 IST2019-08-02T14:50:29+5:302019-08-02T14:53:51+5:30
अभिजीत बिचुकले बिग बॉसच्या घरात गेल्या पासून वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत राहिला आहे. बिग बॉसच्या घरात सध्या सदस्यांचे कुटुंबीय त्याच्या भेटीला येत आहेत.

Bigg Boss Marathi 2: अभिजीत बिचुकलेची पत्नी दिसतेय इतकी सुंदर, पहिल्यांदाच समोर आला Family Photo
अभिजीत बिचुकले बिग बॉसच्या घरात गेल्या पासून वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत राहिला आहे. बिग बॉसच्या घरात सध्या सदस्यांचे कुटुंबीय त्याच्या भेटीला येत आहेत. बिचुकलेच्या कुटुंबीयांनही बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेतली. यात अभिजितची आई, पत्नी आणि मुलं आलेली पाहिला मिळणार आहेत. पहिल्यांदा बिचुकलेचे फॅमिली फोटो समोर आला आहे. अभिजीत बिचुकलेला एक मुलगी आणि एक मुलगा आहे. अभिजीत बिचुकलेने याआधी घरामध्ये अनेक वेळा त्याच्या पत्नीचा आणि मुलांचा उल्लेख केला आहे.
बिग बॉसच्या घरातून बिचुकलेला २०१५मधील एका चेक बाऊन्स प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्याला बिग बॉसच्या घरातून २१ जूनला सातारा पोलिसांनी अटक केली. या केसमध्ये २२ जूनला जामीनही मिळाला होता. पण, त्याच्या विरोधातील खंडणी प्रकरण समोर आले. त्यांनंतर बिचुकलेला साताऱ्याच्या प्रथम न्यायालयात हजर करण्यात आलं. यावेळी कोर्टाने त्याला दिलासा न दिल्याने त्याला तुरुंगात जावं लागले होते.
अटक केल्यानंतर बिचुकलेने एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया दिली होती की, मला बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर काढण्याचा हा कट होता. मी विधानसभेची निवडणूक लढवणार असल्याने हा राजकीय कट आखण्यात आला असल्याचे त्याने सांगितले होते. जामीन मिळल्यानंतर पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरात त्याची एन्ट्री झाली आहे.
अभिजीत बिचुकले राजकारणात अनेक वर्षांपासून कार्यरत असून 2004 पासून तो निवडणूक लढवत आहे. त्याने आतापर्यंत नगरपालिकेपासून ते खासदार पदापर्यंतच्या निवडणुका लढवल्या आहेत. पण बिचुकलेला कोणतीच निवडणूक अद्याप जिंकता आलेली नाही. 2019 निवडणुकीच्यावेळी बिचुकलेने त्याच्या प्रचारासाठी लावलेल्या एका बॅनरची तर प्रचंड चर्चा झाली होती. कारण 2019 चा मुख्यमंत्री मीच असणार असे त्याने त्या बॅनरवर लिहिले होते. या बॅनरवर लोकांनी त्याची चांगलीच खिल्ली उडवली होती.