आम्ही दोघी मालिकेत 'कुछ कुछ होता है' चित्रपटाची झलक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2018 06:00 IST2018-10-19T10:44:43+5:302018-10-20T06:00:00+5:30

मोठी बहीण मीरा निरागस, प्रामाणिक आणि स्वच्छ मनाची आहे तर लहान बहीण मधुरा खोडकर आणि स्वच्छंदी आहे. नुकतंच मालिकेत प्रेक्षकांनी नवीन मधुरा पाहिली

in aamhi doghi serial come a twist | आम्ही दोघी मालिकेत 'कुछ कुछ होता है' चित्रपटाची झलक

आम्ही दोघी मालिकेत 'कुछ कुछ होता है' चित्रपटाची झलक

 'आम्ही दोघी' ही नवीन मालिका झी युवा वाहिनी प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन आली आहे. आम्ही दोघी मालिकेचं कथानक मीरा आणि मधुरा या एकमेकींच्या विरुद्ध व्यक्तिमत्व असलेल्या दोन बहिणींच्या नात्याभोवती फिरते. मोठी बहीण मीरा निरागस, प्रामाणिक आणि स्वच्छ मनाची आहे तर लहान बहीण मधुरा खोडकर आणि स्वच्छंदी आहे. नुकतंच मालिकेत प्रेक्षकांनी नवीन मधुरा पाहिली. शिवानी रांगोळे जी मधुराची भूमिका साकारत होती तिला काही कारणास्तव हि मालिका सोडावी लागली आणि तिच्या जागी प्रसिद्धी किशोर ही मधुराची भूमिका निभावतेय.

मालिकेत योगायोगाने कलाकारांनी कुछ कुछ होता है या चित्रपटाची झलक सादर केली. विवेक सांगळे, खुशबू तावडे आणि प्रसिद्धी किशोर या तिघांनी मिळून कुछ कुछ होता है चित्रपटातील काही क्षण मालिकेत टिपले. चित्रपटात काजोल आणि शाहरुख खान एकमेकांना मिठी मारतात आणि शाहरुख राणी मुखर्जीचा हात पकडतो हा सेम टू सेम सिन आम्ही दोघी मालिकेत प्रेक्षकांनी पाहिला, जिथे मालिकेतील आदित्य मधुराला मिठी मारतो आणि आदित्यमीराचा हात पकडतो. हा क्षण जरी चित्रपटातील असला मालिकेतील या सीनचे कथानक मात्र चित्रपटापेक्षा वेगळं आहे. प्रेक्षकांनी नुकतंच पाहिलं कि मधुराला दिलेलं वाचन पाळण्यासाठी मीरा देवाशिष सोबत लग्न करते. आदित्य याधक्क्यातून सावरू शकत नाहीये आणि त्यात मधुरा त्याला जिंकण्याचे अतोनात प्रयत्न करत आहे.

कुछ कुछ होता है या चित्रपटातील झलक सादर करण्याच्या योगायोग बद्दल खुशबू तावडे म्हणाली, "हा एक निव्वळ योगायोग होता. आता जेव्हा मी त्या सिन बद्दल विचार करते तेव्हा मला ते खूप ड्रॅमॅटिक वाटतं. मी कुछ कुछ होताहै चित्रपटाची खूप मोठी फॅन आहे पण हा सिन जेव्हा आम्ही शूट केला तेव्हा कोणाच्याच हे लक्षात नाही आलं कारण त्याच कथानकच पूर्णपणे वेगळं होतं. प्रसिद्धीने जेव्हा तो फोटो अपलोड केला तेव्हा बऱ्याच लोकांनी त्याच्यावरप्रतिक्रिया दिल्या आणि त्यामुळे आमच्या ही गोष्ट लक्षात आली."

Web Title: in aamhi doghi serial come a twist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.