"आलेच मी...!" नेहा खान थिरकली सई ताम्हणकरच्या लावणीवर, व्हिडीओ होतोय व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 14:20 IST2025-05-20T14:19:42+5:302025-05-20T14:20:12+5:30
Neha Khan : 'देवमाणूस' सिनेमात 'आलेच मी' या लावणीवर सई ठसकेबाज लावणी करताना दिसली. दरम्यान आता या गाण्यावर नेहा खान थिरकली.

"आलेच मी...!" नेहा खान थिरकली सई ताम्हणकरच्या लावणीवर, व्हिडीओ होतोय व्हायरल
अभिनेत्री सई ताम्हणकर (Saie Tamhankar) 'देवमाणूस' (Devmanus Movie) सिनेमातील 'आलेच मी..' (Aalech Mi Lavni) लावणीमुळे चर्चेत आली होती. तिने पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर लावणी सादर केली. सईच्या ठसकेबाज अदांवर चाहते फिदा झाले आहेत. या लावणीवर अनेकांनी रिल बनवले. त्यात बऱ्याच सेलिब्रेटींचेही आलेच मी लावणीवरील रिल पाहायला मिळाले होते. दरम्यान आता या गाण्यावर अभिनेत्री नेहा खान (Neha Khan) थिरकली आहे. तिच्या डान्सला चाहत्यांची खूप पसंती मिळताना दिसते आहे.
नेहा खान सोशल मीडियावर सक्रीय आहे आणि ती या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते. नुकतेच तिने इंस्टाग्रामवर देवमाणूस सिनेमातील आलेच मी लावणीवर डान्स केला आहे. यावेळी नेहाने ग्रीन रंगाची नववारी साडी नेसली आहे. नाकात नथ, कपाळावर चंद्राची कोर, हातात बांगड्या आणि केस मोकळे सोडून तिने लूक पूर्ण केला आहे. आलेच मी या गाण्यावर नेहाने चांगलाच ठेका धरला आहे. तिच्या डान्सला चाहत्यांची खूप पसंती मिळताना दिसते आहे. तिने हा व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, आले..च. मी पहिल्यांदाच लावणी करून पाहिली.
नेहा खानने साउथ सिनेइंडस्ट्रीतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. तिने अभिनेता मोहनलाल यांच्यासोबत '१९७१ बियॉण्ड बॉर्डर्स' मल्याळम चित्रपटाचा तेलगू रिमेक '१९७१ भारता सरीहद्दू'मध्ये काम केले आहे. याशिवाय 'अझाकिया कादल - ब्युटिफुल लव' या मल्याळम सिनेमातही काम केले होते. शिकारी चित्रपटानंतर ती 'काळे धंदे' या झी ५ वरील वेबसीरिजमध्ये झळकली होती. या सीरिजमधल्या तिच्या कामाची खूप प्रशंसा झाली. याशिवाय ती देवमाणूस २ मालिकेतही पाहायला मिळाली.