नवरी सजली! 'आई कुठे काय करते' मालिकेत लग्नाची गडबड, अरुंधतीचा Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2023 09:34 IST2023-03-03T09:31:45+5:302023-03-03T09:34:03+5:30

अनेक अडथळे पार करत दोघेही लग्नबंधनात अडकणार आहेत.

Aai kuthe kay karte serial arundhati and ashutosh getting married video viral | नवरी सजली! 'आई कुठे काय करते' मालिकेत लग्नाची गडबड, अरुंधतीचा Video व्हायरल

नवरी सजली! 'आई कुठे काय करते' मालिकेत लग्नाची गडबड, अरुंधतीचा Video व्हायरल

Aai Kuthe Kay Karte : टीव्ही विश्वातील लोकप्रिय मालिका 'आई कुठे काय करते' सध्या रंजक वळणावर आहे. मालिकेतील मुख्य भूमिकेत असणारी अरुंधती जोगळेकर आणि आशुतोषचं लग्न होणार आहे. अनेक अडथळे पार करत दोघेही लग्नबंधनात अडकणार आहेत. लगीनघाईचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे ज्यामध्ये अरुंधती मुंडावळ्या बांधून लग्नासाठी तयार झालेली दिसत आहे.

लग्नघटिका समीप आली...

आई कुठे काय करते सध्याची सर्वात लोकप्रिय मालिका. घराघरात टीव्हीवर ही मालिका सुरु असते. अरुंधती जोगळेकर आणि आशुतोष केळकर अनेक अडथळे दूर करत अखेर लग्न करणार आहेत. केशरी रंगाची साडी, गजरा, नथ, साजेसे दागिने आणि मुंडावळ्या बांधून अरुंधती नटली आहे. सध्या हा व्हिडिओ व्हायरल होतोय. स्टार प्रवाहने व्हिडिओ शेअर करत 'नवरी सजतेय..' असं कॅप्शनही दिलं आहे.

अरुंधतीचा हा व्हिडिओ खूप पसंत केला जातोय. चाहत्यांना तिचा पारंपारिक लुक खूपच आवडलाय. आता हे लग्न निर्विघ्न पार पडो अशी कमेंट चाहते करत आहेत.

अरुंधतीच्या लग्नात तिचा पहिला नवरा अनिरुद्ध काही ना काही अडचणी आणण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याचा विकृतपणा पुन्हा प्रेक्षकांच्या समोर दिसणार आहे. त्यामुळे हे लग्न सुरळीत पार पडेल का अशी धाकधुक सर्वांना लागली आहे.

Web Title: Aai kuthe kay karte serial arundhati and ashutosh getting married video viral