Aai Kuthe Kay Karte: मी इथे असताना अरूंधती-अरूंधती काय करतोय? भर मुलाखतीत अनिरूद्ध-संजनाचं भांडण
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2022 15:18 IST2022-02-13T15:13:54+5:302022-02-13T15:18:08+5:30
Aai Kuthe Kay Karte : अरूंधती व आशुतोषच्या वाढत्या मैत्रीमुळे अनिरूद्धचा प्रचंड जळफळाट होतो आणि हा अजूनही अरूंधतीची काळजी करतो हे पाहून संजनाचा राग अनावर होतो. भर मुलाखतीत हेच पाहायला मिळालं.

Aai Kuthe Kay Karte: मी इथे असताना अरूंधती-अरूंधती काय करतोय? भर मुलाखतीत अनिरूद्ध-संजनाचं भांडण
‘आई कुठे काय करते’ ( Aai Kuthe Kay Karte) ही छोट्या पडद्यावरची सध्या गाजत असलेली मालिका. या मालिकेबद्दलच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी चाहते प्रचंड उत्सुक असतात. मालिकेतील अरूंधती (Arundhati), अनिरूद्ध (Aniruddha)आणि संजना (Sanjana)या व्यक्तिरेखाही प्रेक्षकांच्या आवडीच्या. सध्या मालिकेत एकापाठोपाठ एक अशी अनेक नवी वळणं पाहायला मिळत आहे. अरूंधती आता घर सोडण्याच्या निर्णयापर्यंत आली आहे आणि याला कारण आहे अनिरूद्ध. अरूंधती व आशुतोषच्या वाढत्या मैत्रीमुळे अनिरूद्धचा प्रचंड जळफळाट होतो आणि हा अजूनही अरूंधतीची काळजी करतो हे पाहून संजनाचा राग अनावर होतो. भरमुलाखतीतही हेच पाहायला मिळालं.
होय, ‘आई कुठे काय करते’च्या सेटवर अनिरूद्ध (मिलिंद गवळी) आणि संजना (रूपाली भोसले) यांनी ‘लोकमत फिल्मी’ला एक खास मुलाखत दिली. पण हे काय? भर मुलाखतीत संजना व अनिरूद्ध भांडू लागले.
अनिरूद्ध सारखा अरूंधती, अरूंधती करतोय म्हटल्यावर संजना प्रचंड संतापली. मग काय? मी इथे असताना तू अरूंधती-अरूंधती काय करतोय? अशा शब्दांत तिने अनिरूद्धला जाब विचारला. मुलाखतीत मिलिंद व रूपाली दोघंही ‘आई कुठे काय करते’बद्दल बोलताहेत.
आशुतोषने व्हॅलेन्टाईनला प्लान केला आणि अरूंधतीला गिफ्ट दिलं तर अनिरूद्धची काय प्रतिक्रिया असेल? असा प्रश्न अनिरूद्धला यावेळी विचारण्यात आला. यावर आशुतोषचं नाव ऐकून अनिरूद्ध अचानक भडकलाच. मार खाईल तो, आता तेच बाकी राहिलं, असं तो म्हणाला. त्याचे ते शब्द ऐकून बाजूला बसलेली संजनाही खवळली. आशुतोषने अरूंधतीवरचं प्रेम व्यक्त केलंय का? तुझ्या मनात खोट आहे, तुला त्यांच्या मैत्रीचा प्रॉब्लेम आहे. अरूंधती व आशुतोष यांच्यात फक्त मैत्री आहे, असं संजना म्हणते. यावर अजिबात मैत्री वगैरे नाही, असं अरूंधती म्हणतो. आता तू अरूंधतीला घटस्फोट दिलायं. ती तुझी बायको नाहीये आता. आता तुझी बायको संजना आहे,मी इथे असताना तू अरूंधती-अरूंधती काय करतोय? असं संजना म्हणते.