Rupali Bhosle : ‘आई कुठे काय करते’च्या ‘संजना’चा बदललेला लुक नेमका कशासाठी? अखेर झाला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2022 16:42 IST2022-10-07T16:40:10+5:302022-10-07T16:42:49+5:30
Aai Kuthe Kay Karte : संजनाची भूमिका साकारणारी अभिनेत्री रूपाली भोसले हिने तिच्या वेगळ्या लुकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. संजनाच्या या लुकमागचं कारण मात्र गुलदस्त्यात होतं....

Rupali Bhosle : ‘आई कुठे काय करते’च्या ‘संजना’चा बदललेला लुक नेमका कशासाठी? अखेर झाला खुलासा
‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या विशेष ओळखीचं झालंय. अनिरूद्ध, अरूंधती, संजना ही प्रेक्षकांची आवडती पात्र. सध्या मात्र चर्चा आहे ती संजनाच्या बदललेल्या लुकची. होय, संजनाची (Sanjana) भूमिका साकारणारी अभिनेत्री रूपाली भोसले (Rupali Bhosle) हिने तिच्या वेगळ्या लुकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. संजनाच्या या लुकमागचं कारण मात्र गुलदस्त्यात होतं. हा लुक नेमका कशासाठी? हे जाणून घेण्याची प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. तर आता त्याचाही खुलासा झाला आहे.
होय, रूपालीचा हा अनोखा अंदाज, तिचा हा नवा लुक मालिकेच्या कथानकाचा भाग नसून एका पुरस्कार सोहळ्यात ती या लुकमध्ये दिसणार आहे. ‘प्रवाह पिक्चर पुरस्कार’ सोहळ्यामध्ये रूपाली ‘अशी ही बनवाबनवी’ या गाजलेल्या सिनेमातील ‘हृदयी वसंत फुलताना’ या गाण्यावर परफॉर्म करणार आहे. याच परफॉर्मन्साठी रुपालीने सुप्रिया पिळगावकर यांच्या सिनेमातील लुकशी मिळताजुळता लूक करण्याचा प्रयत्न केला आहे.
या परफॉर्मन्ससाठी रुपाली अतिशय उत्सुक असून असा हटके प्रयोग तिने पहिल्यांदाच केला आहे. सुप्रसिद्ध अभिनेता भूषण प्रधानसोबत रुपाली या सदाबहार गाण्यावर थिरकताना दिसेल. तेव्हा रुपालीचा हा हटके अंदाज पाहायचा येत्या 16 तारखेला बघायला मिळणार आहे. येत्या रविवारी सायंकाळी 7 वाजता स्टार ्रप्रवाह व प्रवाह पिक्चर वाहिनीवर हा सोहळा आणि या सोहळ्यातील रूपालीचा डान्स प्रेक्षक पाहू शकतील.