लतादीदींची सदाबहार गझल अन् अरुंधतीचा साधेपणा; मधुराणीचा व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2022 19:54 IST2022-05-23T19:52:07+5:302022-05-23T19:54:28+5:30

Madhurani prabhulkar: लोकप्रिय असलेल्या या गझलवर मधुराणीने दिलेले मनमोहक एक्स्प्रेशन्स पाहून नेटकरी पुन्हा तिच्या प्रेमात पडले आहेत.

aai kuthe kay karte fame madhurani prabhulkar latest video viral | लतादीदींची सदाबहार गझल अन् अरुंधतीचा साधेपणा; मधुराणीचा व्हिडीओ व्हायरल

लतादीदींची सदाबहार गझल अन् अरुंधतीचा साधेपणा; मधुराणीचा व्हिडीओ व्हायरल

'आई कुठे काय करते' (Aai kuthe kay karte) या मालिकेत गेल्या कित्येक दिवसांपासून सातत्याने ट्विस्ट येत आहेत. त्यामुळे या मालिकेच्या प्रत्येक नव्या भागाविषयी जाणून घेण्याची प्रेक्षकांना कायमच उत्सुकता असते. म्हणूनच, अनेक प्रेक्षक या मालिकेतील कलाकारांना सोशल मीडियावर फॉलो करतात जेणेकरुन त्यांना मालिकेविषयी, त्यातील कलाकारांविषयीचे अपडेट मिळतील. यात अरुंधती म्हणजेच मधुराणी गोखले-प्रभुलकरदेखील ((Madhurani prabhulkar) कायम चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. नुकताच तिने एक सुंदर व्हिडीओ शेअर करत चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

मधुराणी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून कायम तिच्याविषयी वा मालिकेविषयीचे अपडेट देत असते. यात नुकताच तिने एक छान व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडीओमधून तिचा साधेपणा नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. 

मधुराणीने 'आई कुठे काय करते' मालिकेच्या सेटवरचा एक सुंदर व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये मधुराणीचा रोमॅंटिक अंदाजात दिसून येत आहे. सोबतच्या या व्हिडीओच्या बॅकग्राऊंडला 'फिर छिड़ी रात बात फूलों की...' ही गझल ऐकायला मिळत आहे. ही गझल लता दीदी आणि Talat Aziz यांनी सादर केली आहे. विशेष म्हणजे लोकप्रिय असलेल्या या गझलवर मधुराणीने दिलेले मनमोहक एक्स्प्रेशन्स पाहून नेटकरी पुन्हा तिच्या प्रेमात पडले आहेत.

दरम्यान, मधुराणीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मधुराणी उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच उत्तम कवयित्री आणि गायिका व संगीतकार सुद्धा आहे. आहे. अनेकदा ती तिच्या कविता तिच्या आवाजात सोशल मीडियावर शेअर करत असते. मधुराणीला संगीतकार म्हणून सुंदर माझं घर चित्रपटात पहिला मोठा ब्रेक मिळाला. 

Web Title: aai kuthe kay karte fame madhurani prabhulkar latest video viral