'संजनाला स्वयंपाक येत नाही, पण..'; रुपाली भोसलेने शेअर केला कुकिंग व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2022 19:33 IST2022-05-23T19:32:39+5:302022-05-23T19:33:53+5:30

Aai kuthe kay karte: अरुंधतीच्या विरुद्ध कटकारस्थान करणाऱ्या संजनाला स्वयंपाक येत नाही म्हणून कायम कांचनची बोलणी ऐकवी लागतात.

aai kuthe kay karte fame actress rupali bhosale share her cooking video | 'संजनाला स्वयंपाक येत नाही, पण..'; रुपाली भोसलेने शेअर केला कुकिंग व्हिडीओ

'संजनाला स्वयंपाक येत नाही, पण..'; रुपाली भोसलेने शेअर केला कुकिंग व्हिडीओ

'आई कुठे काय करते' (aai kuthe kay karte) या मालिकेत खलनायिकेची भूमिका साकारुन तुफान लोकप्रियता मिळवलेली अभिनेत्री म्हणजे रुपाली भोसले. या मालिकेत रुपालीने संजना ही भूमिका साकारली आहे. कायम अरुंधतीच्या विरुद्ध कटकारस्थान करणाऱ्या संजनाला स्वयंपाक येत नाही म्हणून कायम कांचनची बोलणी ऐकवी लागतात.  मात्र, खऱ्या आयुष्यात संजना म्हणजेच रुपाली उत्तम सुगरण असून याचा पुरावा तिने अलिकडेच चाहत्यांना दिला आहे.

कलाविश्वाप्रमाणेच सोशल मीडियावर सक्रीय असलेली रुपाली कायम तिच्या प्रोफेशनल लाइफसोबत पर्सनल लाइफ चाहत्यांसोबत शेअर करत असते. यात अलिकडेच तिने तिच्या कुटुंबासोबतचा फोटो शेअर केला होता. त्यानंतर आता तिने स्वयंपाक करतानाचा फोटो शेअर केला आहे. सोबतच संजनाला स्वयंपाक येत नसला, तरीदेखील रुपालीला येतो असं कॅप्शनही तिने दिलं आहे.

रुपालीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती पोळ्या करताना दिसत आहे. "12/14 तास शुटिंग केल्यानंतर जर माझं कशावर प्रचंड प्रेम असेल, माझा ताण घालवणारी गोष्ट असेल तर ती म्हणजे माझं स्वयंपाकावर असलेलं प्रेम. संजनाला स्वयंपाक येत नसला तरीदेखील रुपालीला येतो बरं का..आणि मला त्याचा अभिमान आहे", असं कॅप्शन देत रुपालीने हा व्हिडीओ शेअर केला आहे.

दरम्यान, पूर्वीही रुपालीने स्वयंपाक करतानाचे काही व्हिडीओ, फोटो शेअर केले होते. यात तिने गणपतीच्या दिवसांमध्ये नैवेद्यासाठी मोदक करतानाचा व्हिडीओदेखील पोस्ट केला होता.

Web Title: aai kuthe kay karte fame actress rupali bhosale share her cooking video