फक्त ३ महिने बाकी! 'आई कुठे...' फेम रुपाली भोसलेला लागले गणेशोत्सवाचे वेध, आत्तापासूनच करतेय तयारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 10:44 IST2025-05-27T10:44:05+5:302025-05-27T10:44:28+5:30
यंदा २७ ऑगस्ट रोजी गणपती बाप्पा घरी विराजमान होती. पण, आत्तापासूनच रुपालीला गणेशोत्सवाचे वेध लागले आहेत. अभिनेत्रीने गणरायाची मूर्ती बघण्यासाठी गेली आहे.

फक्त ३ महिने बाकी! 'आई कुठे...' फेम रुपाली भोसलेला लागले गणेशोत्सवाचे वेध, आत्तापासूनच करतेय तयारी
दरवर्षी महाराष्ट्रात मोठ्या थाटामाटात गणेशोत्सव साजरा केला जातो. अनेक सेलिब्रिटींच्या घरीही बाप्पा विराजमान होतात. मराठी कलाकारही मोठ्या उत्साहाने गणेशोत्सव साजरा करतात. अभिनेत्री रुपाली भोसलेच्या घरीही दरवर्षी बाप्पाचं आगमन होतं. यंदा २७ ऑगस्ट रोजी गणपती बाप्पा घरी विराजमान होती. पण, आत्तापासूनच रुपालीला गणेशोत्सवाचे वेध लागले आहेत. अभिनेत्रीने गणरायाची मूर्ती बघण्यासाठी गेली आहे.
रुपालीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ती गणपती बाप्पाची मूर्ती बघण्यासाठी गेली असल्याचं दिसत आहे. या व्हिडिओमध्ये रुपाली गणरायाच्या मूर्ती बघून त्यातील कोणती आपल्या घरी घेऊन जाता येईल याचा विचार करत असल्याचं दिसत आहे. गणेशोत्सवाला ३ महिने बाकी असताना रुपाली आत्तापासूनच गणेशोत्सवाच्या तयारीला लागल्याचं दिसत आहे. "आतुरता तुझ्या आगमनाची...गणपती बाप्पा मोरया", असं म्हणत रुपालीने व्हिडिओ शेअर केला आहे.
दरम्यान, रुपाली भोसले हा मराठी टेलिव्हिजनवरील लाडका चेहरा आहे. 'आई कुठे काय करते' या मालिकेमुळे रुपालीला प्रसिद्धी मिळाली. या मालिकेत तिने संजना हे खलनायिकेचं पात्र साकारलं होतं. तिने साकारलेल्या खलनायिकेच्या भूमिकेलाही चाहत्यांनी पसंती दर्शविली. रुपालीने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. बिग बॉस मराठीमध्येही ती सहभागी झाली होती.