'आई कुठे काय करते' फेम विशाखाच्या लेकीला पाहिलंय का? स्वप्नील जोशीसोबत केलंय काम
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2023 17:34 IST2023-10-31T17:33:34+5:302023-10-31T17:34:06+5:30
Punam Chandorkar: पूनमच्या लेकीचं नाव आर्या असं आहे.

'आई कुठे काय करते' फेम विशाखाच्या लेकीला पाहिलंय का? स्वप्नील जोशीसोबत केलंय काम
स्टार प्रवाहवरील 'आई कुठे काय करते' (aai kuthe kay karte) या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. आजवर या मालिकेचे कित्येक भाग झाले आहेत. त्यामुळे या मालिकेतील प्रत्येक कलाकार आता प्रेक्षकांना आपलासा वाटतो. त्यामुळे पडद्यावर झळकणाऱ्या या कलाकारांच्या रिअल लाइफविषयी जाणून घेण्याचाही चाहते प्रयत्न करत असतात. यामध्ये सध्या या मालिकेतील विशाखा हिच्या लेकीची चर्चा रंगली आहे.
या मालिकेत अभिनेत्री पूनम चांदोरकर (Punam Chandorkar), विशाखा ही भूमिका साकारत आहे. विशेष म्हणजे आईच्याच पावलावर पाऊल ठेवत तिच्या लेकीने कलाविश्वात पदार्पण केलं आहे. काही दिवसांपूर्वीच पूनमची लेक एका जाहिरातीमध्ये झळकली.
दरम्यान, पूनमच्या लेकीचं नाव आर्या असं आहे. आर्याने जाहिरातीच्या माध्यमातून कलाविश्वात पदार्पण केलं आहे. विशेष म्हणजे ती देखील पूनमप्रमाणेच शांत स्वभावाची असल्याचं म्हटलं जातं.