विस्कटलेले केस अन् थकलेला चेहरा; 'आई कुठे...' फेम अभिनेत्रीला ओळखलं? नवीन लूक चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2024 12:14 IST2024-11-07T12:09:44+5:302024-11-07T12:14:27+5:30

'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्री अश्विनी महांगडेने सोशल मीडियावर तिचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोतील तिच्या लूकने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.

aai kuthe kay karte fame actress ashvini mahangade new look photo viral on social media  | विस्कटलेले केस अन् थकलेला चेहरा; 'आई कुठे...' फेम अभिनेत्रीला ओळखलं? नवीन लूक चर्चेत

विस्कटलेले केस अन् थकलेला चेहरा; 'आई कुठे...' फेम अभिनेत्रीला ओळखलं? नवीन लूक चर्चेत

Ashvini Mahangade : स्टार प्रवाहवरील 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe kay Karte) या मालिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. देशमुख कुटुंबातील आई, अप्पा, अरुंधती, अनिरुद्ध, अभिषेक या सगळ्याच मंडळीने रसिकांना आपलंस केलं. जवळपास ५ वर्षांनी ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. या मालिकेप्रमाणे त्यातील पात्रांनीही प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. अशातच मालिकेतील अनघा म्हणजेच अभिनेत्री अश्विनी महांगडेने (Ashvini Mahangade) नुकताच सोशल मीडियावर तिचा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमधील अभिनेत्रीचा नवा लूक चर्चेत आहे.


अभिनेत्री अश्विनी महांगडेसोशल मीडियावर कमालीची सक्रिय असते. त्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. तिच्या वैयक्तिक आयुष्याबरोबर नव्या प्रोजेक्टबद्दल ती सोशल मीडियाद्वारे माहिती देत असते. नुकताच अश्विनीने तिच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर फोटो शेअर केल्याचा पाहायला मिळतोय. या फोटोमध्ये अभिनेत्री विस्कटलेले केस तसेच फाटकी साडी नेसून बसलेली दिसते आहे. सध्या तिच्या या नव्या लूकची सर्वत्र चर्चा होत आहे.

"रोज सहावी दुःखे सत्तर, नशिबावरती शिंपडूनी अत्तर; एकच जीवन, एकच संधी, मग जगून पहावे स्वतः सविस्तर..." असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलंय. शिवाय #NewProject असा टॅग देखील फोटोंच्या कॅप्शनखाली अश्विनीने दिला आहे. त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 'आई कुठे काय करते' नंतर अश्विनी कोणत्या नव्या भूमिकेत पाहायला मिळणार हे पाहणं महत्वाचं ठरेल. 

Web Title: aai kuthe kay karte fame actress ashvini mahangade new look photo viral on social media