'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्याचं डेस्टिनेशन वेडिंग! कोणालाही न सांगता गुपचूप केलं लग्न, पाहा व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2025 13:15 IST2025-06-01T13:15:14+5:302025-06-01T13:15:33+5:30

मालिका संपल्यानंतर 'आई कुठे काय करते'मधील एका कलाकाराने गुपचूप लग्न केलं आहे. त्याच्या लग्नाचा व्हिडिओ समोर आला आहे.

aai kuthe kay karte fame actor niranjan kulkarni married shared destination wedding video | 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्याचं डेस्टिनेशन वेडिंग! कोणालाही न सांगता गुपचूप केलं लग्न, पाहा व्हिडिओ

'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्याचं डेस्टिनेशन वेडिंग! कोणालाही न सांगता गुपचूप केलं लग्न, पाहा व्हिडिओ

'आई कुठे काय करते' ही छोट्या पडद्यावरील गाजलेली मालिका. या मालिकेने ५ वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यानंतर निरोप घेतला. 'आई कुठे काय करते'मधील अरुंधतीप्रमाणेच इतर कलाकारांवरही प्रेक्षकांनी मनापासून प्रेम केलं. आता मालिका संपल्यानंतर 'आई कुठे काय करते'मधील एका कलाकाराने गुपचूप लग्न केलं आहे. त्याच्या लग्नाचा व्हिडिओ समोर आला आहे. 

'आई कुठे काय करते'मध्ये अभिषेकची भूमिका साकारलेला अभिनेता निरंजन कुलकर्णी याने गुपचूप लग्न केलं आहे. निरंजनने त्याच्या लग्नाचा व्हिडिओ शेअर करत ही गुडन्यूज चाहत्यांना दिली आहे. निरंजनने कुटुंबीय आणि मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत डेस्टिनेशन वेडिंग केलं. "प्रेम साजरं करत नवीन सुरुवात करत आहोत", असं कॅप्शन त्याने व्हिडिओला दिलं आहे. त्याच्या व्हिडिओवर कमेंट करत चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. 


आयुष्यातील या खास क्षणासाठी दोघांनीही खास लूक केला होता. निरंजनने काळ्या रंगाचा सूट परिधान केला होता. तर त्याच्या पत्नीने डिझायनर गाऊन घातला होता. त्यांच्या लग्नाच्या सिनेमॅटिक व्हिडिओत खास क्षण कैद करण्यात आले आहेत. निरंजन कुलकर्णीच्या पत्नीचं नाव मनिषा गुरम असं आहे. मनिषा ही पेशाने न्युट्रीशिनिस्ट आणि लाइफ एक्सपर्ट आहे.  

Web Title: aai kuthe kay karte fame actor niranjan kulkarni married shared destination wedding video