मराठी सिनेसृष्टीतील ही प्रसिद्ध अभिनेत्री आहे 'आई कुठे काय करते'मालिकेतील यशची सखी बहीण
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2021 17:35 IST2021-12-18T14:32:58+5:302021-12-18T17:35:41+5:30
आई कुठे काय करते (Aai kuthe kay karte) मालिकेला कमी कालावधीत खूपच लोकप्रिय ठरली आहे. या मालिकेत यशची भूमिका अभिनेता अभिषेक देशमुख (Abhishek Deshmukh) साकारतो आहे.

मराठी सिनेसृष्टीतील ही प्रसिद्ध अभिनेत्री आहे 'आई कुठे काय करते'मालिकेतील यशची सखी बहीण
आई कुठे काय करते (Aai kuthe kay karte) मालिकेला कमी कालावधीत खूपच लोकप्रिय ठरली आहे. या मालिकेतील अनिरूद्ध, अरुंधती, यश, आप्पा, आजी, अभि, ईशा या सर्वच पात्रांना प्रेक्षकांची खूप पसंती मिळते आहे. या मालिकेत यशची भूमिका अभिनेता अभिषेक देशमुख (Abhishek Deshmukh) साकारतो आहे. यापूर्वी अभिषेकने मराठी मालिका आणि चित्रपटात काम केले आहे. फार कमी लोकांना माहित आहे की अभिषेक देशमुखची बहिणीही प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
अभिषेक देशमुखच्या बहीणचं नाव अमृता देशमुख आहे. छोट्या पडद्यापासून अमृताने करिअरची सुरुवात केली.'तुमचं आमचं सेम असतं'या मालिकेत अमृता दिसली होती.अमृताने स्वीटी सातारकर सिनेमातून रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं. अमृता आणि अभिषेक एकमेकांसोबतचे फोटो सोशल मीडियावर नेहमी शेअर करत असतात. फोटोंमध्ये बहीण-भावामधले बॉन्डिग दिसून येतं.
अभिनेता अभिषेक देशमुखने या मालिकेआधी पसंत आहे मुलगी या मालिकेत काम केले होते. यात त्याने साकारलेली पुनर्वसूची भूमिका केली होती आणि ही भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती.याशिवाय तो होम स्वीट होम या मराठी चित्रपटातही तो झळकला आहे. याशिवाय १५ ऑगस्टमध्येही त्याने काम केले आहे. या व्यतिरिक्त अभिषेकने वेबसीरिजमध्येही काम केले आहे.