आशुतोषने पहिल्यांदाच दिलं अरुंधतीला गिफ्ट; दोघांमध्ये खुलतीये प्रेमाची कळी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2022 17:57 IST2022-04-26T17:56:26+5:302022-04-26T17:57:04+5:30

Aai kuthe kay karte: अरुंधती प्रचंड साधी राहात असल्यामुळे साध्या गोष्टी वापरणंच तिला विशेष आवडतं. मात्र, काळानुसार बदलण्यासोबत काही वस्तू, व्यक्तीमत्त्व बदलणं देखील गरजेचं आहे याची जाणीव आशुतोष तिला करुन देतो.

aai kuthe kay karte Ashutosh gave a gift to Arundhati for the first time | आशुतोषने पहिल्यांदाच दिलं अरुंधतीला गिफ्ट; दोघांमध्ये खुलतीये प्रेमाची कळी?

आशुतोषने पहिल्यांदाच दिलं अरुंधतीला गिफ्ट; दोघांमध्ये खुलतीये प्रेमाची कळी?

स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते या मालिकेने अभूतपूर्व यश संपादन केलं आहे. अवघ्या काही भागांमध्येच लोकप्रिय झालेली ही मालिका आज टीआरपीमध्ये प्रथम स्थानावर असल्याचं पाहायला मिळतं. देशमुखांच्या कुटुंबात राहत असताना अरुंधतीवर अनेक बंधनं होती. मात्र, अनिरुद्धपासून विभक्त झाल्यानंतर अरुंधती स्वत: च्या पायावर खंबीरपणे उभी राहिली. इतकंच नाही तर तिच्या या प्रवासात आशुतोषने तिला साथ दिली. त्यामुळे त्यांच्यातील मैत्री दिवसेंदिवस दृढ होत आहे. यामध्येच आता आशुतोष तिला पहिल्यांदाच एक भेटवस्तू देणार आहे.

सध्या सोशल मीडियावर या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये आशुतोष चक्क अरुंधतीला स्मार्टफोन गिफ्ट करतो. अरुंधती प्रचंड साधी राहात असल्यामुळे साध्या गोष्टी वापरणंच तिला विशेष आवडतं. मात्र, काळानुसार बदलण्यासोबत काही वस्तू, व्यक्तीमत्त्व बदलणं देखील गरजेचं आहे याची जाणीव आशुतोष तिला करुन देतो.

दरम्यान, आशुतोष आणि नितीन यांनी दिलेलं गिफ्ट पाहून अरुंधती भारावून जाते. यापूर्वी तिला असं इतकं महागडं गिफ्ट कोणीच दिलं नव्हतं. त्यामुळे हे गिफ्ट पाहून ती आश्चर्यचकित होते. इतकंच नाही तर पहिल्यांदाच अरुला तिच्या आयुष्यात दोन हक्काचे मित्र मिळाले आहेत. त्यामुळे ही मालिका सध्या रंजक वळणावर सुरु असल्याचं दिसून येत आहे.

Web Title: aai kuthe kay karte Ashutosh gave a gift to Arundhati for the first time