Video: अनिरुद्ध जोमात, देशमुख कोमात! ईशाच्या साखरपुड्यात अनिरुद्धने केला भन्नाट डान्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2023 17:31 IST2023-05-11T17:30:49+5:302023-05-11T17:31:53+5:30
Aai kuthe kay karte: ईशाचा साखरपुडा होत असल्याचं पाहून अनिरुद्ध प्रचंड खूश झाला आहे. त्यामुळे तो बेभान होऊन नाचत आहे.

Video: अनिरुद्ध जोमात, देशमुख कोमात! ईशाच्या साखरपुड्यात अनिरुद्धने केला भन्नाट डान्स
छोट्या पडद्यावर गाजत असलेली लोकप्रिय मालिका म्हणजे 'आई कुठे काय करते' (aai kuteh kay karte). या मालिकेत आतापर्यंत अरुंधतीच्या आयुष्यात अनेक चढउतार आले आहेत. मात्र, आशुतोषसोबत लग्न केल्यानंतर आता कुठे तिच्या आयुष्यात आनंदाचे क्षण आले आहेत. यामध्येच आता तिच्या लेकीचा ईशाचा साखरपुडा होत आहे त्यामुळे देशमुखांच्या कुटुंबात आनंदाचा वातावरण निर्माण झालं आहे. विशेष म्हणजे कायम नाकाचा शेंडा लाल करुन बसलेला अनिरुद्धदेखील यावेळी उत्साहात, आनंदात आहे. सध्या सोशल मीडियावर त्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
ईशा आणि अनिश यांचा लवकरच साखरपुडा होणार आहे. त्यामुळे देशमुखांच्या घरात लगबग सुरु आहे. प्रत्येक जण हा सोहळा एन्जॉय करत आहे. इतकंच नाही तर अनिरुद्ध आनंदाच्या भरात चक्क डान्स करतो. त्याचा हा डान्स पाहून घरातील प्रत्येक जण थक्क होऊन जातो.
दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या प्रोमोमध्ये अनिरुद्ध बेफामपणे डान्स करत आहे. विशेष म्हणजे त्याचं हे रुप पहिल्यांदाच सगळ्यांनी पाहिलं आहे. तसंच या साखरपुड्यात आशुतोषची बहीण आणि अनिरुद्धची बिझनेस पार्टनर हिचीदेखील एन्ट्री होणार आहे. त्यामुळे या मालिकेत पुढे काय घडतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.