अरुंधती पाठोपाठ आप्पांनीही सोडला देशमुखांचा बंगला; मालिकेत मोठा ट्विस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2022 13:16 IST2022-03-30T13:16:09+5:302022-03-30T13:16:09+5:30

Aai kuthe kay karte: संयमाने वागणाऱ्या अरुंधतीला कांचनही संधी मिळेल तेव्हा बोल लावत असते. मात्र, आता यावेळी तिने चक्क आप्पांनाच खरंखोटं सुनावलं आहे.

aai kuthe kay karte After Arundhati Appa also left Deshmukh's bungalow | अरुंधती पाठोपाठ आप्पांनीही सोडला देशमुखांचा बंगला; मालिकेत मोठा ट्विस्ट

अरुंधती पाठोपाठ आप्पांनीही सोडला देशमुखांचा बंगला; मालिकेत मोठा ट्विस्ट

'आई कुठे काय करते' या मालिकेत गेल्या कित्येक दिवसांपासून देशमुखांच्या कुटुंबात कोणती ना कोणती घटना घडत असल्याचं पाहायला मिळत आहे. अरुंधती स्वबळावर पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे. तर, दुसरीकडे अनिरुद्ध आणि संजना वारंवार तिचा पाय मागे खेचण्याचा प्रयत्न करत आहे. यामध्येच संयमाने वागणाऱ्या अरुंधतीला कांचनही संधी मिळेल तेव्हा बोल लावत असते. मात्र, आता यावेळी तिने चक्क आप्पांनाच खरंखोटं सुनावलं आहे. याचाच परिणाम आप्पा घर सोडून निघून जाणार आहेत.

सध्या सोशल मीडियावर या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये कांचन, अरुंधतीला वाट्टेल तसं बोलत असते. त्यामुळे आप्पा मध्यस्थी करत कांचनला शांत करण्याचा प्रयत्न करतात. मात्र, हे घर तुमचं नाही. अनिरुद्धचं आहे, असं कांचन सांगते. त्यांमुळे दुखावलेले आप्पा घर सोडण्याचा निर्णय घेतात.

'जर यापुढे तू अरुंधतीला एकही शब्द बोललीस तर मी तुझ्या हाताला धरुन तुला घराबाहेर काढेन', असं आप्पा म्हणतात. त्यावर 'तुम्ही कोण मला घराबाहेर काढणारे हे घर अनिरुद्धने उभं केलं आहे. या घरात तुमचं काही नाही', असं कांचन सगळ्यांसमोर म्हणते.

दरम्यान, कांचनने केलेला आप्पांचा अपमान पाहून अरुंधती घरातून निघून जाते. मात्र, यावेळी आप्पाही तिच्यासोबत घर सोडून जायला निघतात. त्यामुळे आता या मालिकेत काय होतंय? आप्पा खरंच घर सोडून जाणार का? कांचन देशमुखांच्या घरात एकटीच पडणार का? या प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना मालिका पाहिल्यावरच मिळणार आहेत.

Web Title: aai kuthe kay karte After Arundhati Appa also left Deshmukh's bungalow