"छत्रपती शिवरायांचं मूळ चित्र भारतात परत आणायला हवं.."; मिलिंद गवळींची पोस्ट चर्चेत, नेमकं काय म्हणाले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 12:32 IST2025-03-27T12:31:29+5:302025-03-27T12:32:51+5:30

मिलिंद गवळींनी लिहिलेली नवीन पोस्ट चर्चेत आहे. यात त्यांनी ब्रिटनचे राजकीय नेते ऋषी सुनक यांच्याकडे खास मागणी केली आहे (milind gawali)

aai kuthe kay karte actor milind gawali demand chhatrapati shivaji maharaj original painting brink back to india | "छत्रपती शिवरायांचं मूळ चित्र भारतात परत आणायला हवं.."; मिलिंद गवळींची पोस्ट चर्चेत, नेमकं काय म्हणाले?

"छत्रपती शिवरायांचं मूळ चित्र भारतात परत आणायला हवं.."; मिलिंद गवळींची पोस्ट चर्चेत, नेमकं काय म्हणाले?

'आई कुठे काय करते' मालिकेतून चर्चेत आलेले अभिनेते मिलिंद गवळींनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. मिलिंद गवळी लिहितात की, "माझं बालपण डिलाईल रोडला गेलं. लोअर परेल, डिलाईल रोड, लालबाग परळ हा सगळा मिल कामगारांचा एरिया, या भागामध्ये असंख्य ब्रिटिशांनी बांधलेल्या कापसाच्या गिरण्या होत्या. गावा खेड्यातून, कोकणातून माणसं या मिलमध्ये काम करण्यासाठी मुंबईत आली, ब्रिटिशांनी त्यांच्यासाठी बीडीडी चाळी बांधल्या, काळ्या दगडाच्या भक्कम चाळी, पण एकेक दीड दीड खोल्यांच्या, कबुतरांच्या खोपट्यां सारखी, अनेक पिढ्या त्या खोपट्यांमध्ये वाढल्या."


"आपल्या सगळ्यांना त्या खोपट्यांमध्ये राहायची इतकी सवय झाली की ब्रिटिशांना जाऊन 78 वर्षे झाली तरी सुद्धा आपण त्याच पद्धतीची घर बांधतो आणि त्याच खोपट्यांमध्ये राहतो, फक्त एखाद बेडरूम वाढलं, माझे वडील मुंबई पोलीस खात्यात होते म्हणून माझं बालपण डिलाईल रोडला ब्रिटिशांच्या कॉर्टरस मध्ये गेलं, साडेतीन हजार स्क्वेअर फिटचं घर होतं ते, कदाचित म्हणूनच आता मला मुंबईच्या या सिमेंट काँक्रीटच्या जंगलात, छोट्या छोट्या घरात घुसमटल्यासारखं होतं, कदाचित म्हणूनच श्वास घ्यायला निसर्गात जास्त रमतो, पर्वा २५ वर्षांनी मी आणि दिपा जिजामाता उद्यानात फिरायला गेलो, मुंबईतली ८०% झाडाची वनस्पती या राणीच्या बागेत आहे, तिथे असंख्य प्राणी आहेत पण मला पिंजऱ्यात डाम्बून ठेवलेल्या प्राण्यांमध्ये रस नसतो."



"तिथे एका गोष्टीने माझं लक्ष वेधलं, ते म्हणजे तिथल्या भव्य दिव्य पुतळ्यांनी, एक बाल शिवाजी आणि जिजामाता यांचा सुंदर पुतळा पण आहे, त्याचबरोबर असंख्य ब्रिटिशांचे पुतळे आहे, जे आपल्या कोणालाच इन्स्पायर करत नाहीत. ब्रिटनचे प्रधानमंत्री ऋषी सनक यांच्याशी बोलून ते ब्रिटनला पाठवून द्यायला काहीच हरकत नाही, त्याच्या बदल्यात भारतातू लुटून नेलेल्या असंख्य वस्तू त्यांच्याकडे आहेत, ते परत आणता येतील, मी असा ऐकलं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचे original painting ब्रिटनमध्ये आहे. ते तर परत आणणे गरजेचंच आहे."


     

Web Title: aai kuthe kay karte actor milind gawali demand chhatrapati shivaji maharaj original painting brink back to india

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.