'आई कुठे काय करते' मालिकेच्या सेटवर १४ वर्षानंतर मिलिंद गवळीला भेटला 'हा' बालकलाकार, किस्साही आहे खास
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2021 19:53 IST2021-08-25T19:47:11+5:302021-08-25T19:53:26+5:30
'आई कुठे काय करते' मालिका दिवसेंदिवस रंजक वळणामुळे रसिकही खिळून आहेत. मालिकेतील सगळीच पात्रही रसिकांच्या तितकीच आवडीची बनली आहेत. ...

'आई कुठे काय करते' मालिकेच्या सेटवर १४ वर्षानंतर मिलिंद गवळीला भेटला 'हा' बालकलाकार, किस्साही आहे खास
'आई कुठे काय करते' मालिका दिवसेंदिवस रंजक वळणामुळे रसिकही खिळून आहेत. मालिकेतील सगळीच पात्रही रसिकांच्या तितकीच आवडीची बनली आहेत. मालिकेत अनेक ट्विस्ट आणि टर्नमुळे आवडत्या लोकप्रिय मालिकेच्या यादीत ही मालिकाही गणली जाते. अल्पावधीतच मालिकेने रसिकांची पसंती मिळवली होती. पहिल्या भागापासून ही मालिका रसिकांची आवडती मालिका बनली आहे. आता मालिकेत आणखी नवीन घडामोडी पाहायला मिळणार आहेत.
मालिकेतल्या कलाकारांचे माहाराष्ट्रात प्रचंड चाहते आहेत. त्यांची एक झलक पाहण्यासाठी आतुर असतात. अभिनेता मिलिंद गवळी यांचा असाच एक चाहता त्यांना खास भेटण्यासाठी मालिकेच्या सेटवर आला होता. त्याला पाहून मिलिंद गवळीही सुखद धक्काच बसला कारण जो चाहता त्यांना भेटण्यासाठी आला होता.
बालकलाकार म्हणून ''काल भैरव” सिनेमात तो झळकला होता. २००६ साली हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. समर्थ असे त्याचे नाव. याच मालिकेतल्या अभिनेत्री शीतल क्षीरसागर यांचा तो नातेवाईक आहे. त्यांनीच समर्थ आणि मिलिंदची भेट घडवून आणली.
'काल भैरव' सिनेमात समर्थ अगदी काही महिन्यांचाच होता.इतक्या लहान वयात तो रुपेरी पडद्यावर झळकला होता.सिनेमातल्या एका सीनमध्ये समर्थला सापासोबत खेळताना दाखवण्यात आले होते. हा सीन शूट होत होता त्यावेळी समर्थचे आई- वडिलही तिथे हजर होते. मिलींद यांनी समर्थच्या आई वडिलांनाच सापाची भीती वाटत नाही का असा प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी उत्तर दिले होते की, आम्ही सापाला खूपदा पकडले आहे त्यामुळे आम्ही सापाला खूप चांगलं ओळखतो. तो आमच्या मुलाला काहीही करणार नाही.
इतक्या वर्षानंतर त्या छोट्याशा दिसणाऱ्या समर्थला आज भेटून फार आनंद झाल्याचे त्यांनी सांगितले. चिमुकला समर्थ आता फार मोठा झाला आहे. इतक्या वर्षानंतर समर्थची भेट घडवून आणली म्हणून शीतलचेही मिलिंद यांनी आभार मानलेत. समर्थसह क्लिक केलेल्या खास क्षणांचे फोटोही त्यांनी सोशल मीडियावर शेअर करत त्यांची ही छानशी आठवणही त्यांनी चाहत्यांसह शेअर केली आहे.