क्या बात! गणपतीच्या आरतीत तबला वाजवताना दिसले आदेश बांदेकर, भावोजींच्या व्हिडिओवर चाहत्यांच्या कमेंट, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2024 13:14 IST2024-09-09T13:13:39+5:302024-09-09T13:14:03+5:30
महाराष्ट्राचे लाडके भावोजी आदेश बांदेकर यांच्या घरीही दरवर्षी गणेशोत्सव साजरा केला जातो. यावर्षीही बांदेकरांच्या घरी जल्लोषात बाप्पाचं आगमन झालं.

क्या बात! गणपतीच्या आरतीत तबला वाजवताना दिसले आदेश बांदेकर, भावोजींच्या व्हिडिओवर चाहत्यांच्या कमेंट, म्हणाले...
सध्या राज्यात सर्वत्र गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळत आहे. दरवर्षी अनेक सेलिब्रिटीही मोठ्या धुमधडाक्यात गणेशोत्सव साजरा करताना दिसतात. मराठी आणि बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पा विराजमान झाले आहेत. महाराष्ट्राचे लाडके भावोजी आदेश बांदेकर यांच्या घरीही दरवर्षी गणेशोत्सव साजरा केला जातो. यावर्षीही बांदेकरांच्या घरी जल्लोषात बाप्पाचं आगमन झालं.
दरवर्षी बांदेकर कुटुंबीय एकत्र येत बाप्पाची मनोभावे पूजा करतात. यावर्षीही बांदेकरांच्या घरी गणेशोत्सवाची धामधुम पाहायला मिळत आहे. आदेश बांदेकरांनी एक व्हिडिओ त्यांच्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केला आहे. गणरायाची आरती करतानाचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओत बांदेकर कुटुंबीय बाप्पाच्या आरतीसाठी एकत्र जमल्याचं पाहायला मिळत आहे. आरती म्हणताना सगळ्यांनी ताल धरल्याचं पाहायला मिळत आहे. तर या आरतीला आदेश बांदेकरांनी तबल्याची आणि सोहमने टाळ वाजवत उत्तम साथ दिल्याचं दिसत आहे. आदेश बांदेकरांनी शेअर केलेल्या या व्हिडिओवर कमेंट करत चाहत्यांनी त्यांचं कौतुक केलं आहे.
आदेश बांदेकर हे मराठी सिनेसृष्टीतील एक मोठं नाव आहे. गेली कित्येक वर्ष ते प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन करत आहेत. होम मिनिस्टर या कार्यक्रमाने बांदेकरांना खरी ओळख मिळवून दिली. पण, २० वर्षांनंतर आता होम मिनिस्टर बंद होणार असल्याचं म्हटलं जात आहे. आदेश बांदेकरांनी याबाबत एक पोस्ट केली होती. त्यामुळे या चर्चांना उधाण आलं आहे.