"तू मर्द असशील तर तिच्याकडून...", पूजाला प्रपोज कर म्हणत आदेश बांदेकरांनी सोहमला केलेला मेसेज
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 11:50 IST2026-01-15T11:49:44+5:302026-01-15T11:50:51+5:30
लग्नानंतर पहिल्यांदाच सोहम आणि पूजाने त्यांची लव्हस्टोरी एका मुलाखतीत सांगितली. पूजाला प्रपोज करण्यासाठी थेट आदेश बांदेकर यांनी हस्तक्षेप केल्याचं सोहमने सांगितलं.

"तू मर्द असशील तर तिच्याकडून...", पूजाला प्रपोज कर म्हणत आदेश बांदेकरांनी सोहमला केलेला मेसेज
सोहम बांदेकर आणि पूजा बिरारी हे मराठी कलाविश्वातील नवविवाहित जोडपं आहेत. डिसेंबर २०२५ मध्ये सोहम आणि पूजाने लग्नाच्या बेडीत अडकत सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. त्याआधी काही वेळ ते एकमेकांना डेट करत होते. सोहम आणि पूजाच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. लग्नानंतर पहिल्यांदाच सोहम आणि पूजाने त्यांची लव्हस्टोरी एका मुलाखतीत सांगितली.
सोहम आणि पूजाने राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत त्यांची लव्हस्टोरी आणि पहिल्या प्रपोजचा धम्माल किस्सा सांगितला. पूजाला प्रपोज करण्यासाठी थेट आदेश बांदेकर यांनी हस्तक्षेप केल्याचं सोहमने सांगितलं. सोहम म्हणाला, "मी ९ ऑगस्ट २०२४ रोजी पूजाला प्रपोज केलं होतं. त्याआधी आम्ही नॉर्मल बोलत होतो. तोपर्यंत मला हिच्या उत्तराचा अंदाज आला होता. त्यामुळे मी घरी सांगून टाकलं होतं. तेव्हा बाबा अमेरिकेत होते. ते तिथून रोज सकाळी मला ऑल द बेस्ट म्हणायचा. त्यानंतर १५-२० दिवस माझ्याकडून काही अपडेट नव्हतं".
"एक दिवस बाबांनी मला मेसेज केला की तू मर्द असशील तर हिच्याकडून हो म्हणवून घेशील. ते म्हणाले सोहम मुलगी चांगली आहे. तुझ्या टेंटेटिव्हनेसमध्ये तू तिला घालवू नकोस. नाहीतर मी बोलतो तिच्याशी... तिच्या बर्थडेच्या दिवशी मी तिला फक्त डिनरला घेऊन जाणार होतो. पण, माझी आई आणि चुलत बहीण त्यांनी मला ट्रिगर केलं. की आज तू हिला विचार... तिच्या बर्थडेच्या दिवशी आम्ही डिनरला गेलो होतो. तिथे मी तिला विचारलं आणि तिने हो म्हटलं", असा मजेशीर किस्सा सोहमने सांगितला.