'जीव माझा गुंतला'मध्ये येणार नवीन वळण, मल्हार अंतराला दिलेले हे वचन करणार का पूर्ण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2022 16:06 IST2022-01-25T15:55:22+5:302022-01-25T16:06:07+5:30
जीव माझा गुंतला (JeevMajhaGuntala) मालिका सध्या रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे

'जीव माझा गुंतला'मध्ये येणार नवीन वळण, मल्हार अंतराला दिलेले हे वचन करणार का पूर्ण?
कलर्स मराठीवरील जीव माझा गुंतला (JeevMajhaGuntala) मालिका सध्या रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. अंतरा मोठ्या संकटात अडकली असून या सगळ्यामध्ये तिला मल्हारची साथ मिळणार आहे. लग्नानंतर अंतराशी भांडणार, तिच्यावर तितकासा विश्वास नसणार मल्हार आता अंतराच्या बाजूने लढताना प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. या प्रवासात मल्हारला मिळाली आहे नवी “हमसफर”. अंतरा आणि अंतराची हमसफर आता संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिध्द आहेच. पण आता मल्हारदेखील हमसफर चालवताना मालिकेमध्ये दिसणार आहे. त्याच सीनचे शूटिंग सुरू असताना काढलेले काही फोटोज... आता मल्हारने हमसफरची मदत का घेतली? नक्की काय झालं ? हे मालिकेमध्ये बघायला मिळणार आहे.
अंतराला चित्राकाकीने ड्रग्सच्या केस मध्ये अडकवले खरे पण, यानिमित्ताने कुठेतरी अंतरा आणि मल्हारच्या नात्याला नवे वळण तर मिळणार नाही ना ? असा प्रश्न आपल्या सगळ्यांच्याच मनामध्ये येऊन गेला असणार. काही दिवसांपूर्वी समोर आलेल्या प्रोमोमध्ये मल्हारने अंतराला शब्द दिला जेव्हा बाजू सत्याची असते तेव्हा शंकेला जागा नसते, तुला निर्दोष सोडवणे आता माझी जबाबदारी असे म्हणताना तो दिसला. बघूया मल्हार अंतराला दिलेला शब्द कसा पाळणार.