स्मितहास्याची भेट! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' टीमने वृद्धाश्रमात वाटला दिवाळीचा आनंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 15:24 IST2025-10-20T15:21:25+5:302025-10-20T15:24:11+5:30
'Maharashtrachi Hasyajatra : दिवाळीचे औचित्य साधून सोनी मराठीवरील प्रेक्षकांच्या लाडक्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातील कलाकारांनी यंदाची दिवाळी एका अत्यंत खास आणि प्रेरणादायी पद्धतीने साजरी केली आहे.

स्मितहास्याची भेट! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' टीमने वृद्धाश्रमात वाटला दिवाळीचा आनंद
संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या विनोदाने वेड लावणारा अभिनेता ओंकार भोजने पुन्हा एकदा 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या मंचावर परतला आहे आणि त्याच्या चाहत्यांसाठी ही एक खूप मोठी आणि आनंदाची बातमी आहे. सोनी मराठी वाहिनीवरील 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या लोकप्रिय कार्यक्रमातून ओंकार घराघरात पोहोचला. त्याचं 'अगं अगं आई...' म्हणणारा ओंक्या हे पात्र असो वा 'हा इथे काय करतोय' विचारणाऱ्या मामाची भूमिका... भोजनेने आपल्या विनोदाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. ओंकारने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांना खळखळून हसवलं. प्रेक्षकांच्या या मागणीला मान देत ओंकार भोजने पुन्हा एकदा महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमात परत आहे. त्याचा परत येण्याने प्रेक्षकांना दिवाळीच बोनस नक्कीच मिळाला आहे.
दिवाळीचे औचित्य साधून सोनी मराठीवरील प्रेक्षकांच्या लाडक्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातील कलाकारांनी यंदाची दिवाळी एका अत्यंत खास आणि प्रेरणादायी पद्धतीने साजरी केली आहे. नेहमीच प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारी ही टीम, दिवाळीचा आनंद गरजू लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मुंबईतील बोरिवली येथील सिटीझन वेलफेर असोसिएशन या वृद्धाश्रमाला पोहोचली.
ओंकार भोजनेचं दमदार कमबॅक
यावेळी नुकताच 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमात पुनरागमन करणारा ओंकार भोजने उपस्थित होते. सोबतच शिवाली परब, वनिता खरात हे कलाकार उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाचे सर्वेसर्वा निर्माते आणि दिग्दर्शक सचिन गोस्वामी आणि लेखक निर्माते सचिन मोटे देखील उपस्थित होते. यावेळी सगळ्या कलाकारांनी वृद्धाश्रमातील सर्व वृद्धांसोबत वेळ घालवला. सोबतच त्यांच्यासोबत फराळाचा आनंद देखील घेतला. त्यांच्या तब्बेतीची विचारपूस देखील केली. नेहमी टीव्हीवर आपल्या लाडक्या विनोदवीरांना ते नेहमीच पाहतात पण आता प्रत्यक्षात त्यांना पाहताना वृद्धाश्रमातील मंडळींच्या चेहऱ्यावर हसू उमटलं.
''माणुसकीचा संदेश देण्याचा अनोखा प्रयत्न केला''
यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना अभिनेत्री ओंकार भोजने म्हणाला, "आम्ही रोज टीव्हीवर लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणतो, पण आज ज्येष्ठांसोबत प्रत्यक्ष दिवाळी साजरी करताना मिळालेला आनंद अवर्णनीय आहे. दिवाळी म्हणजे 'प्रकाश आणि आनंद वाटणे', आणि आज आम्हाला तो खरा आनंद मिळाला." 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' टीमने आपल्या कलेच्या माध्यमातून समाजात आनंद पसरवण्याचा आणि दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर माणुसकीचा संदेश देण्याचा हा अनोखा प्रयत्न केला आहे. सामाजिक बांधिलकी जपत, ही टीम भविष्यातही असे उपक्रम राबवण्यासाठी उत्सुक आहे.