92 वर्षांच्या आज्जी आहेत 'नवा गडी नवं राज्य' मालिकेच्या जबरा फॅन, आनंदी, रमाची भेट घेत दिले आशीर्वाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2023 18:50 IST2023-04-27T18:37:04+5:302023-04-27T18:50:07+5:30

तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल पण पुण्यातील ९२ वर्षांच्या एक आजी देखील मालिकेच्या मोठ्या फॅन आहेत. लोकमत सखी मंच आयोजित कार्यक्रमात या आजींनी 'नवा गडी नवं राज्य' मालिकेच्या टीमची भेट घेतली.

92 years old grandmother big fan of marathi serial on zee marathi nava gadi nava rajya | 92 वर्षांच्या आज्जी आहेत 'नवा गडी नवं राज्य' मालिकेच्या जबरा फॅन, आनंदी, रमाची भेट घेत दिले आशीर्वाद

92 वर्षांच्या आज्जी आहेत 'नवा गडी नवं राज्य' मालिकेच्या जबरा फॅन, आनंदी, रमाची भेट घेत दिले आशीर्वाद


मराठी मालिकांनी प्रेक्षकांना वेड लावलं आहे. मराठी मालिकांचा प्रेक्षकवर्ग वाढतोय. साहजिकच, वेगवेगळ्या विषयावरच्या मराठी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. ओटीटीचे प्रस्थ कितीही वाढले तरीही यात मालिकांची जादू काही कमी झालेली नाही. आजही मालिका पाहणार मोठा प्रेक्षक वर्ग आहे. मालिका पाहताना प्रेक्षकाना त्या त्यांच्या कुटुंबाचा भाग वाटतात. त्यामुळे अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्ध माणसांपर्यंत सगळे आवर्जून मालिका पाहतात.

तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल पण पुण्यातील ९२ वर्षांच्या एक आजी देखील मालिकेच्या मोठ्या फॅन आहेत. सध्या त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. 

पुण्यात अलिकडेच लोकमत सखी मंच आणि झी मराठी आयोजित उत्सव नात्यांचा हा कार्यक्रम पार पडला. यावेळी झी मराठीवरील 'नवा गडी नवं राज्य' आणि 'अप्पी आमची कलेक्टर' या मालिकेच्या कलाकारांनी हजेरी लावली होती.  तर त्यांना भेटायला त्यांच्या चाहत्यांनी चांगलीच गर्दी केली होती.

या गर्दीत सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं ते ९२ वर्षांच्या एका आजीने. या आजी झी मराठी वरील मालिकांच्या फॅन असून 'नवा गडी नवं राज्य' ही मालिका आवर्जून पाहतात. या कार्यक्रमात त्यांनी हजेरी तर लावलीच पण कलाकारांवर माया करत त्यांना भरभरून आशीर्वाद दिले.

Web Title: 92 years old grandmother big fan of marathi serial on zee marathi nava gadi nava rajya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.