"कामात यांची निष्ठा फार, स्वभाव यांचा शांत...", समाधान रावांसाठी तेजस्विनी लोणारीचा खास उखाणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 17:13 IST2025-12-06T17:11:23+5:302025-12-06T17:13:10+5:30
तेजस्विनी आणि समाधान यांच्या लग्नातील एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये गृहप्रवेश झाल्यानंतर तेजस्विनी समाधानरावांसाठी खास उखाणा घेत असल्याचं दिसत आहे.

"कामात यांची निष्ठा फार, स्वभाव यांचा शांत...", समाधान रावांसाठी तेजस्विनी लोणारीचा खास उखाणा
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्री तेजस्विनी लोणारी लग्नाच्या बेडीत अडकली आहे. तेजस्विनीने शिंदे गटाचे युवानेते समाधान सरवणकर यांच्यासोबत लग्नगाठ बांधली आहे. तेजस्विनी आणि समाधान यांचा शाही विवाहसोहळा दत्तजयंतीच्या मुहुर्तावर गुरुवारी(४ डिसेंबर) पार पडला. त्यांच्या लग्नाला कलाविश्वातील सेलिब्रिटी आणि राजकीय नेत्यांनीही हजेरी लावली होती. तेजस्विनी आणि समाधान यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.
तेजस्विनी आणि समाधान यांच्या लग्नातील एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये गृहप्रवेश झाल्यानंतर तेजस्विनी समाधानरावांसाठी खास उखाणा घेत असल्याचं दिसत आहे. "कामात यांची निष्ठा फार, स्वभाव यांचा शांत, मला वाटतो अभिमान कारण समाधान राव आहेत माझे ---", असा झक्कास उखाणा तेजस्विनीने घेतला. याचा व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडीओत तेजस्विनीला उखाणा घेण्यासाठी आग्रह करत असल्याचं दिसत आहे. तेजस्विनीने समाधान यांच्यासाठी घेतलेला हा उखाणा तिने स्वत:च तयार केल्याचं अभिनेत्रीने सांगितलं.
दरम्यान, तेजस्विनीने अनेक मालिका आणि सिनेमांमध्येही काम केलं आहे. मराठी कलाविश्वातील ती लोकप्रिय चेहरा आहे. तेजस्विनीला 'बिग बॉस मराठी'मुळे प्रसिद्धी मिळाली. एक अभिनेत्री असण्यासोबतच ती निर्मातदेखील आहे. समाधान सरवणकर हे शिवसेना नेते सदा सरवणकर यांचे पुत्र असून ते राजकारणात सक्रिय आहेत. तेजस्विनी आणि समाधान यांनी काही महिन्यांपूर्वीच साखरपुडा करत चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. आता लग्न करत त्यांनी नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे.