तान्या मित्तलने शेअर केला होम थिएटरचा व्हिडीओ; नेटकरी म्हणाले, "जे जे बोलली ते खरंच होतं..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 16:03 IST2025-12-15T16:03:26+5:302025-12-15T16:03:50+5:30
तान्या मित्तलच्या घरी होम थिएटर, बघा व्हिडीओ

तान्या मित्तलने शेअर केला होम थिएटरचा व्हिडीओ; नेटकरी म्हणाले, "जे जे बोलली ते खरंच होतं..."
'बिग बॉस १९'मध्ये तान्या मित्तल हे नाव खूप चर्चेत होतं. काही दिवसांपूर्वीच या सीझनचा फिनाले झाला. तान्या टॉप ५ मध्ये होती मात्र नंतर ती एलिमिनेट झाली.ग्वालियरच्या तान्याने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक खुलासे केले होते. कशाप्रकारे तिचे फॅमिली बिझनेस आहेत, महागड्या गाड्या आहेत आणि घरात होम थिएटरही आहे. अनेकांना तान्या खोटं बोलत आहे असंच वाटलं होतं. अगदी सलमाननेही तिची खिल्ली उडवली होती. मात्र आता तान्या घरी परतली असून तिने सांगितलेली एक एक गोष्ट खरी असल्याचं दिसत आहे.
तान्या मित्तलने इन्टाग्रामवर व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये तिच्या घराच्या हॉलमध्ये सगळे सदस्य बसून बिग बॉस १९ चा फिनाले बघत आहेत. संपूर्ण खोलीत अंधार असून समोर प्रोजेक्टर आहे. हे तान्याचं होम थिएटर असल्याचं दिसत आहे. तान्याने लिहिले, 'माझं कुटुंब रोज माझ्यासोबत बिग बॉस पाहत होतं. जान्हवी कपूर, वरुण धवन आणि मनीष पॉल मी तुम्हाला सांगितलं होतं ना की आम्ही असेच तुमचे सिनेमेही बघतो.'
तान्याच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. 'तू जे बोलत होतीस ते सगळं खरं निघतंय','मजा येतीये..आता बोला सगळं फेक होतं , एआय होतं','हेटर्स कुठे गेले?' असं म्हणत चाहत्यांनी तान्याची बाजू घेतली आहे. तान्याचं ग्वालियर येथील घरी जंगी स्वागत झालं. ती कुटुंबियांची गळाभेट घेत अक्षरश: रडली. याचेही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.