तर शो बंद करा..., ‘Taarak Mehta Ka Ooltah Chashmah’च्या मेकर्सवर भडकले चाहते, पण का?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2022 12:32 PM2022-06-10T12:32:33+5:302022-06-10T12:33:03+5:30

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : होय, ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ ही मालिका ट्रोल होताना दिसतेय. नवा प्रोमो पाहून अनेकांनी मालिकेला ट्रोल करायला सुरूवात केली आहे.

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Dayaben Fans Got Angry On Maker | तर शो बंद करा..., ‘Taarak Mehta Ka Ooltah Chashmah’च्या मेकर्सवर भडकले चाहते, पण का?

तर शो बंद करा..., ‘Taarak Mehta Ka Ooltah Chashmah’च्या मेकर्सवर भडकले चाहते, पण का?

googlenewsNext

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या मालिकेच्या चाहत्यांसाठी गुडन्यूज आहे. ही गुडन्यूज तुम्हाला ठाऊक आहेच. होय, मालिकेत दयाबेनची एन्ट्री होणार आहे. दीर्घ प्रतीक्षेनंतर दयाबेन (Dayaben) शोमध्ये परतणार आहे. अर्थात हे आम्ही नाही तर शोचा नवा प्रोमो सांगतो आहे. सोनी सबने सोशल मीडियावर एक नवा प्रोमो शेअर केला आहे. यात दयाबेनची एन्ट्री होताना दाखवली आहे. पण दयाबेन दिशा वकानी (Disha Vakani) नसून तिच्या जागी नव्या अभिनेत्रीची एन्ट्री होणार असल्याचं कळतंय.

दिशा वकानी आता शोमध्ये कधीच परतणार नाही, हे ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’चे निर्माते असित मोदी यांनी स्पष्ट केलं आहे. तिच्याजागी नवी दयाबेन येणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ही दयाबेन कोण असणार? हे अद्याप गुलदस्त्यात आहे. पण तूर्तास दयाबेनच्या एन्ट्रीवरून सोशल मीडियावर चाहते वेगळाच सूर आवळताना दिसत आहेत. होय, दयाबेनच्या एन्ट्रीवरून ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ ही मालिका ट्रोल होताना दिसतेय. नवा प्रोमो पाहून अनेकांनी मालिकेला ट्रोल करायला सुरूवात केली आहे. मालिकेत वेळोवेळी जुन्या स्टोरी रिपीट होत असल्याचं पाहून चाहते संतापले आहेत.

‘दयाबेनच्या एन्ट्रीवरून गेम खेळलाच तर मी हा शो पाहणं बंद करेल,’ असा धमकीवजा इशारा एका युजरने दिला आहे. अनेकांनी दयाबेन म्हणून दिशा वकानी हीच हवी, असा आग्रह केला आहे. ‘दिशा शोमध्ये दिसणार नसेल तर शो बंद करा. कमीत कमी आत्तापर्यंत मिळवलेली प्रतिष्ठा तरी कायम राहिल,’अशी प्रतिक्रिया एका युजरने दिली आहे. ‘वारंवार जुन्या स्टोरी रिपीट करत आहात. पोपटलालच्या लग्नासारख्या. आता दया भाभीबद्दलही तेच. पुन्हा तिच ती कॉमेडी,’ अशी कमेंट एका युजरने केली आहे. मेकर्स नेहमीप्रमाणे यावेळी दयाबेनच्या वापसीवरून प्रँक करत असल्याची शंका अनेक चाहत्यांनी व्यक्त केली आहे. याआधीही अनेकदा दयाबेन येणार अशी ट्रिक मेकर्सनी वापरली होती. पण आता कदाचित प्रेक्षक अशा ट्रिकला कंटाळले आहेत.

तूर्तास नवी अभिनेत्री दयाबेन म्हणून परतणार, असं म्हटलं जातंय. ही अभिनेत्री कोण, हे लवकरचं कळेलच. ती आल्यानंतर प्रेक्षकांच्या पसंतीत उतरते की नाही, हेही बघूच.

Web Title: Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Dayaben Fans Got Angry On Maker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.