'तारक मेहता का उल्टा चष्मा' फेम प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन; दयाबेनशी होतं खास नातंं

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 12:20 IST2026-04-07T12:20:17+5:302026-04-07T12:20:54+5:30

'तारक मेहता का उल्टा चष्मा' या लोकप्रिय मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्याचं निधन झालं आहे. या अभिनेत्याचं खऱ्या आयुष्यात 'दयाबेन' सोबत खास नातं होतं

Taarak Mehta Ka Ooltah Chashma fame actor bhim vakani passed away disha vakani father | 'तारक मेहता का उल्टा चष्मा' फेम प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन; दयाबेनशी होतं खास नातंं

'तारक मेहता का उल्टा चष्मा' फेम प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन; दयाबेनशी होतं खास नातंं

'तारक मेहता का उल्टा चष्मा' या लोकप्रिय मालिकेतील अभिनेते भीम वकानी (bhim vakani) यांचं निधन झालं आहे. भीम वकानी हे मालिकेतील 'दयाबेन'ची भूमिका साकारणारी अभिनेत्री दिशा वकानीचे वडील होते. वडिलांचं निधन झाल्याने दिशाच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दिशा वकानीचे वडील भीम वकानी (Bhim Vakani) यांचे निधन झाले असून, मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी यांनी ही बातमी सर्वांना सांगितली.

असित मोदींनी भीम यांच्याविषयी भावना व्यक्त करताना सांगितलं की, ''त्यांची तब्येत काही दिवसांपासून ठीक नव्हती. आज सकाळी त्यांचं निधन झालं. भीम वकानी उत्कृष्ट अभिनेते, चित्रकार आणि दिग्दर्शकही होते. त्यांनी लगान सिनेमातही काम केलं. त्यांची लेक दिशाने दयाबेनच्या भूमिकेतून जे यश मिळवलं याबद्दल त्यांना आनंद होता. दिशाचं करिअर घडवण्यात त्यांचं खूप योगदान होतं. आमचं कुटुंबासारखं नातं होतं. जेव्हा ते मुंबईत यायचे तेव्हा माझ्या घरी येऊन आम्ही फिरायला जायचो. माझ्या कुटुंबातील सदस्य गेल्याची भावना मनात आहे.''



विशेष म्हणजे, भीम वकानी हे केवळ दिशा वकानीचे वडील नव्हते, तर त्यांनी 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेतही काही भागांमध्ये काम केले होते. मालिकेत त्यांनी चंपकलाल गडा (बापूजी) यांच्या मित्राची भूमिका साकारली होती. याशिवाय भीम वकानी हे गुजराती नाट्यसृष्टीतील एक दिग्गज कलाकार होते. त्यांनी अनेक नाटकं आणि चित्रपटांमध्ये काम केले होते. आपल्या दोन्ही मुलांनी, म्हणजेच दिशा आणि मयूरने अभिनय क्षेत्रात नाव कमवावे, यासाठी त्यांनी नेहमीच प्रोत्साहन दिले होते.

या बातमीने 'तारक मेहता...'च्या चाहत्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. सोशल मीडियावर चाहते दिशा आणि तिच्या कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त करत आहेत. दिशा वकानी सध्या अभिनय क्षेत्रापासून दूर असून आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे, अशा कठीण काळात चाहते तिला धीर देत आहेत.

Web Title : 'तारक मेहता' फेम अभिनेता भीम वकानी का निधन; दयाबेन से था संबंध

Web Summary : 'तारक मेहता' के अभिनेता और दिशा वकानी (दयाबेन) के पिता भीम वकानी का निधन हो गया। वह 'लगान' और 'तारक मेहता' में भी दिखे थे। उद्योग में शोक की लहर।

Web Title : 'Taarak Mehta' Fame Actor Bhim Vakani Passes Away; Related to Dayaben

Web Summary : Bhim Vakani, actor from 'Taarak Mehta,' and father of Disha Vakani (Dayaben), passed away. He was also an actor & director who appeared in 'Lagaan' and 'Taarak Mehta'. The industry mourns his loss.