सूरजच्या लग्नात अक्षय कुमारसह अजित पवार, सुप्रिया सुळेंची उपस्थिती असणार, पत्रिकेनं वेधलं लक्ष!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 11:35 IST2025-11-28T11:33:27+5:302025-11-28T11:35:26+5:30
उपमुख्यमंत्र्यांपासून ते बॉलिवूड सुपरस्टारपर्यंत! सूरज चव्हाणच्या विवाहसोहळ्याची गेस्ट लिस्ट व्हायरल

सूरजच्या लग्नात अक्षय कुमारसह अजित पवार, सुप्रिया सुळेंची उपस्थिती असणार, पत्रिकेनं वेधलं लक्ष!
Suraj Chavan Wedding: 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाणची (Suraj Chavan) सध्या लग्नसराई सुरू आहे. उद्या अर्थात २९ नोव्हेंबरला सूरज चव्हाण आपल्या मामाची मुलगी संजना गोफणे हिच्याशी लग्नगाठ बांधणार आहे. लग्न ठरल्यापासूनच सूरज आणि संजनाचे अनेक व्हिडीओ, फोटो आणि त्यांची लग्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली. अशातच सूरजच्या लग्नाची गेस्ट लिस्ट समोर आली आहे. ज्यामध्ये महाराष्ट्रातील अनेक महत्त्वाच्या नेत्यांपासून दिग्गज कलाकारांची नावे आहेत.
सूरज चव्हाणच्या लग्नात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्र्यांपासून ते हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठ्या सुपरस्टारची उपस्थित राहणार असल्याची चर्चा आहे. उपमख्यमंत्री अजित पवार व त्यांच्या पत्नी सुनित्रा अजित पवार, सुप्रिया सुळे, आमदार विजय बापू शिवतारे, संजय जगताप, अशोक टेकवडे हे दिग्गज राजकीय क्षेत्रातून प्रमुख उपस्थिती लावतील. तर या लग्नाचा सर्वात मोठा आकर्षण बिंदू म्हणजे मनोरंजन विश्वातून येणारे दिग्गज असतील. केवळ मराठी नव्हे तर हिंदी चित्रपटसृष्टीतील मोठी नावे या यादीत आहेत.
व्हायरल झालेल्या या पत्रिकेमध्ये एका अभिनेत्याचे नाव सर्वाधिक लक्ष वेधून घेत आहे. तो म्हणजे बॉलिवूडचा सुपरस्टार अक्षय कुमार.अक्षय कुमार, रितेश देशमुख, मराठी चित्रपटसृष्टीचे कॉमेडी किंग अशोक सराफ, ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर आणि पॅडी कांबळे यांची नावे लग्नपत्रिकेत आहेत.

याशिवाय, सूरजच्या लग्नाला 'बिग बॉस'च्या पाचव्या पर्वातील कलाकार उपस्थित राहतील. यामध्ये अभिजीत सावंत, केदार शिंदे, अंकिता वालावलकर, आर्या जाधव, इरीना, अभिषेक करंगुटकर, अरबाज पटेल, निखिल दामले, वैभव चव्हाण, जान्हवी किल्लेकर, निक्की तांबोळी, धनंजय पोवार, संग्राम चौगुले, पुरुषोत्तम दादा पाटील, योगिता चव्हाण, घनश्याम दरोडे, अंकिताचा नवरा कुणाल भगत आणि उत्कर्ष शिंदे यांसारख्या कलाकारांचा समावेश आहे. एकंदरीत, सूरज चव्हाणचे लग्न यंदाच्या वर्षातील सर्वात मोठा राजकीय-सेलिब्रिटी इव्हेंट ठरणार यात शंका नाही.