सुनील ग्रोव्हर आणि शिल्पा शिंदेमध्ये हाणामारी, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2018 11:36 IST2018-04-27T11:24:55+5:302018-04-27T11:36:28+5:30

या व्हिडीओमध्ये शिल्पा आणि सुनील ग्रोव्हर मारामारी करताना दिसत आहेत. इतकेच काय तर सुनीलने शिल्पाचा हाथ पिरगळला.

Sunil Grover and Shilpa Shinde ugly fight on the sets of dhan dhana dhan | सुनील ग्रोव्हर आणि शिल्पा शिंदेमध्ये हाणामारी, व्हिडीओ व्हायरल

सुनील ग्रोव्हर आणि शिल्पा शिंदेमध्ये हाणामारी, व्हिडीओ व्हायरल

मुंबई : कॉमेडियन सुनील ग्रोव्हर आयपीएलची खास सीरिज जिओ धन धना धन मध्ये व्यस्त आहे. या शोमध्ये सुनीलसोबत शिल्पा शिंदे आणि सुगंधा मिश्रा देखील काम करत आहे. सध्या यांच्याशी संबंधित एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. 

या व्हिडीओत दोघांमध्ये हाणामारी होतीये पण ही हाणामारी खरी नाहीये. हा त्यांच्या शूटिंगचा भाग आहे. या व्हिडीओमध्ये शिल्पा आणि सुनील ग्रोव्हर मारामारी करताना दिसत आहेत. इतकेच काय तर सुनीलने शिल्पाचा हाथ पिरगळला. नंतर तो तिला खाली पाडतो. त्यानंतर ती सावरते आणि पलटवार करायला सुरुवात करते. शूटींग दरम्यानचा हा व्हिडीओ आहे जेव्हा दोघेही एकमेकांवर हल्ला करतायत. 



 

यात सुनील प्रोफेसर LBW ची भूमिका साकारते आहे तर शिल्पा गुगल देवीची भूमिका करत आहे. या आठवडयात हा एपिसोड बघायला मिळणार आहे. 

Web Title: Sunil Grover and Shilpa Shinde ugly fight on the sets of dhan dhana dhan