Ashish Warang Death: अभिनेते आशिष वारंग यांचे आकस्मिक निधन; मराठी, बॉलिवूड चित्रपट सृष्टीवर शोककळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 22:38 IST2025-09-05T22:38:07+5:302025-09-05T22:38:41+5:30
Ashish Warang Passes Away: वारंग हे गेल्या काही काळापासून आजारी होते, असे सांगितले जात आहे. ते ५५ वर्षांचे होते.

Ashish Warang Death: अभिनेते आशिष वारंग यांचे आकस्मिक निधन; मराठी, बॉलिवूड चित्रपट सृष्टीवर शोककळा
Ashish Warang Death: अक्षय कुमारच्या 'सूर्यवंशी' चित्रपटात आशिष तांबेची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते आशिष वारंग यांचे आज निधन झाले. अचानक निधनाच्या बातमीने मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे आणि सर्वांना धक्का बसला आहे.
आशिष वारंग यांनी अनेक मराठी, हिंदी चित्रपटांमध्ये मोठमोठ्या अभिनेत्यांसोबत काम केले होते. आशिष वारंग यांनी 'दृश्यम', 'सूर्यवंशी', 'मर्दानी' आणि 'एक व्हिलन रिटर्न्स' यासह अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. 'बॉम्बे' या अॅक्शन ड्रामा चित्रपटात त्यांनी अखेरची भुमिका केली होती.
वारंग हे गेल्या काही काळापासून आजारी होते, असे सांगितले जात आहे. ते ५५ वर्षांचे होते.