प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने गुपचूप केलं लग्न, बॉयफ्रेंडसोबत घेतले सात फेरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 11:10 IST2025-05-20T11:09:19+5:302025-05-20T11:10:00+5:30

मल्याळम टीव्ही अभिनेत्री आणि नृत्यांगणा नयना जोसन हिने बॉयफ्रेंडसोबत सात फेरे घेत नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. तिच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत.

south tv actress nayana josan tied knot with long term bf gokul | प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने गुपचूप केलं लग्न, बॉयफ्रेंडसोबत घेतले सात फेरे

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने गुपचूप केलं लग्न, बॉयफ्रेंडसोबत घेतले सात फेरे

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने गुपचूप लग्न केलं आहे. मल्याळम टीव्ही अभिनेत्री आणि नृत्यांगणा नयना जोसन हिने बॉयफ्रेंडसोबत सात फेरे घेत नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. तिच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत. अभिनेत्री नयना बॉयफ्रेंड गोकुळसोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे. पारंपरिक पद्धतीने त्यांचा विवाहसोहळा पार पडला. 

आयुष्यातील या खास क्षणासाठी नयनाने कांजीवरम साडी नेसून भरजरी दागिने घालत खास लूक केला होता. तर गोकुळने लुंगी आणि कुर्ता असा पारंपरिक पेहराव केला होता. त्यांच्या लग्नाला साऊथ इंडस्ट्रीतील सेलिब्रिटींनीही हजेरी लावली होती. कुटुंबीय आणि मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत त्यांचा विवाहसोहळा पार पडला. गेल्या काही वर्षांपासून नयना आणि गोकु रिलेशनशिपमध्ये होते. गेल्या वर्षी त्यांनी साखरपुडा केला होता. आता लग्नाच्या बेडीत अडकत त्यांनी नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. 


नयनाने बालकलाकार म्हणून अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. तिने अनेक मालिका आणि रिएलिटी शोमध्ये सहभाग घेतला आहे. पवित्रम या मालिकेतील राधा या व्यक्तिरेखेने तिला वेगळी ओळख मिळवून दिली. नयना अभिनेत्री असण्यासोबतच एक नृत्यांगणादेखील आहे. नयनाचा पती गोकुळ हादेखील पेशाने डान्सर आहे. 

Web Title: south tv actress nayana josan tied knot with long term bf gokul

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.