'धुरंधर'सोबत क्लॅश टळला! यशचा 'टॉक्झिक' पोस्टपोन, रणवीरला घाबरला साउथ सुपरस्टार? कारण समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 11:41 IST2026-03-04T11:40:42+5:302026-03-04T11:41:56+5:30

'टॉक्झिक'ची रिलीज डेट का पुढे ढकलली? मेकर्स म्हणाले...

yash starrer toxic film release date postponed due to middle east tension wont clash with dhurandhar | 'धुरंधर'सोबत क्लॅश टळला! यशचा 'टॉक्झिक' पोस्टपोन, रणवीरला घाबरला साउथ सुपरस्टार? कारण समोर

'धुरंधर'सोबत क्लॅश टळला! यशचा 'टॉक्झिक' पोस्टपोन, रणवीरला घाबरला साउथ सुपरस्टार? कारण समोर

दाक्षिणात्य सुपरस्टार यशचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'टॉक्सिक: अ फेअरीटेल फॉर ग्रोन अप्स' १९ मार्च रोजी रिलीज होणार होता. आदित्य धर-रणवीर सिंहच्या 'धुरंधर:द रिव्हेंज'सोबत बॉक्सऑफिसवर होणार हे निश्चित झालं होतं. मात्र आता 'टॉक्झिक'ची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मध्यपूर्वेत (मिडल ईस्ट) सुरू असलेल्या संघर्षामुळे सिनेमा पोस्टपोन करत असल्याची घोषणा मेकर्सने केली आहे. 

सुपरस्टार यशने त्याच्या प्रोडक्शन हाऊस आणि केव्हीएन (KVN) प्रोडक्शन्सच्या वतीने एक निवेदन जारी करून प्रदर्शनाच्या तारखेतील बदलाचे कारण स्पष्ट केले. निवेदनात म्हटले आहे की, "टॉक्झिक: अ फेअरी टेल फॉर ग्रोनअप्स' हा सिनेमा आम्ही ग्लोबल स्तरावर प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी बनवला आहे. सिनेमा इंग्रजी आणि कन्नडमध्ये आहे जो स्थानिक आणि जगाभरातील प्रेक्षांपर्यंत पोहोचेल. अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर १९ मार्चला सिनेमा रिलीज करण्यासाठी आम्ही आतुर होतो. मात्र सध्याची परिस्थिती पाहता विशेषत: मध्य पूर्वेतील संघर्ष पाहता आमचं जागतिक पातळीवरील प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचं ध्येय पूर्ण होऊ शकणार नाही. म्हणूनच आम्ही विचार करुन रिलीज डेट पुढे ढकलण्याचा कठीण निर्णय घेतला आहे. तुम्ही आम्हाला समजून घ्याल, संयम ठेवाल आणि असंच प्रेम व पाठिंबा देत राहाल त्यासाठी धन्यवाद.  टॉक्झिक आता ४ जून २०२६ रोजी इंग्रजी आणि भारतीय भाषांमध्ये सिनेमागृहात रिलीज होईल."

चाहत्यांमध्ये नाराजी आणि उत्सुकता
२ मार्च रोजी या चित्रपटातील 'तबाही' हे पहिले गाणे प्रदर्शित झाले होते. या गाण्याचे कौतुक झाले असले तरी, त्याचा व्हिडिओ शेअर न केल्यामुळे चाहते काहीसे नाराज होते. ८ मार्च रोजी बेंगळुरूमध्ये चित्रपटाचा भव्य ट्रेलर लाँच करण्याची तयारी सुरू असतानाच चित्रपट पुढे ढकलल्याची ही बातमी समोर आली आहे.

'टॉक्सिक' हा चित्रपट गीतू मोहनदास यांनी दिग्दर्शित केला असून यशने याचे सह-लेखन केले आहे. हा चित्रपट इंग्रजी आणि कन्नड भाषेत चित्रित करण्यात आला आहे. सिनेमात यशसोबत कियारा अडवाणी, तारा सुतारिया, नयनतारा, रुक्मिणी वसंत आंच्या भूमिका आहेत.

Web Title : यश की 'टॉक्सिक' स्थगित: टकराव टला? रिलीज में देरी, कारण सामने।

Web Summary : यश की 'टॉक्सिक' की रिलीज मध्य पूर्व संघर्ष के कारण स्थगित, रणवीर सिंह की 'धुरंधर' से टकराव टला। नई रिलीज तिथि: 4 जून, 2026। प्रशंसक निराश।

Web Title : Yash's 'Toxic' Postponed: Clash Averted? Release Delayed, Reason Revealed.

Web Summary : Yash's 'Toxic' release delayed due to Middle East conflict, avoiding clash with Ranveer Singh's 'Dhurandhar'. New release date: June 4, 2026. Fans disappointed.