विजय सेतुपतीच्या ब्लॉकबस्टर 'महाराजा'च्या सिक्वेलवर शिक्कामोर्तब; कधी प्रदर्शित होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 14:43 IST2026-03-16T13:47:33+5:302026-03-16T14:43:05+5:30

'महाराजा २' येणार असल्याची पुष्टी स्वतः विजय सेतुपतीने केली आहे.

Vijay Sethupathis Maharaja Sequel Confirmed Director Nithilans Story Complete | विजय सेतुपतीच्या ब्लॉकबस्टर 'महाराजा'च्या सिक्वेलवर शिक्कामोर्तब; कधी प्रदर्शित होणार?

विजय सेतुपतीच्या ब्लॉकबस्टर 'महाराजा'च्या सिक्वेलवर शिक्कामोर्तब; कधी प्रदर्शित होणार?

दाक्षिणात्य इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेता विजय सेतुपतीनं अनेक चित्रपटांत दमदार अभिनय करीत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. जगभरात त्याचा चाहतावर्ग मोठा आहे. विजय सेतुपतीचे चित्रपट एकापेक्षा असतात. विजयच्या कारकिर्दीतील ५० वा आणि सर्वात यशस्वी चित्रपट ठरलेल्या  'महाराजा' या चित्रपटाच्या जबरदस्त 'क्लायमॅक्स'ने प्रेक्षकांना थक्क केले होते. आता या चित्रपटाच्या सिक्वेलबद्दल माहिती समोर आली आहे.  'महाराजा २' येणार असल्याची पुष्टी स्वतः विजय सेतुपतीने केली आहे. 

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत विजय सेतुपतीने चित्रपटाबद्दल माहिती दिली. तो म्हणाला, "दिग्दर्शक निथिलन समीनाथन यांनी 'महाराजा २'ची कथा पूर्ण केली आहे. मी ही पटकथा वाचण्यास आणि पुन्हा एकदा ती व्यक्तिरेखा जगण्यास खूप उत्सुक आहे. आम्ही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येऊ". मात्र, हा चित्रपट कधी प्रदर्शित होईल, याबाबत अभिनेत्याने अद्याप निश्चित तारीख स्पष्ट केलेली नाही.

जून २०२४ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'महाराजा' चित्रपटाने प्रेक्षकांना आणि समीक्षकांना प्रेमात पाडलं होतं. केवळ २० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने जगभरात १०० कोटी रुपयांहून अधिक कमाई करत बॉक्स ऑफिसवर नवा इतिहास रचला होता. एका सामान्य व्यक्तीच्या आयुष्यातील एका घटनेने संपूर्ण कथानकाला मिळालेले वळण आणि त्यातील सस्पेन्स प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता.

सिक्वेलमध्ये काय असेल खास?
पहिल्या भागात अनुराग कश्यपने साकारलेली खलनायकाची भूमिका आणि चित्रपटाचा धक्कादायक 'क्लायमॅक्स' ही या सिनेमाची सर्वात मोठी ताकद होती. 'महाराजा २'मध्ये कथा पहिल्या भागाच्या पुढे जाईल की एक नवी सस्पेन्सफुल गोष्ट दाखवली जाईल, याबाबत सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.  'महाराजा २' सिक्वेल येतोय ही बातमीविजय सेतुपतीच्या चाहत्यांसाठी एखाद्या मोठ्या सेलिब्रेशनपेक्षा कमी नाही.

Web Title : विजय सेतुपति की ब्लॉकबस्टर 'महाराजा' का सीक्वल कन्फर्म; रिलीज की तारीख जल्द?

Web Summary : विजय सेतुपति ने 'महाराजा 2' की पुष्टि की, पहली फिल्म की बड़ी सफलता के बाद। निर्देशक निथिलन समीनाथन ने स्क्रिप्ट पूरी कर ली है। हिट सस्पेंस थ्रिलर के सीक्वल की रिलीज की तारीख का इंतजार है।

Web Title : Vijay Sethupathi's blockbuster 'Maharaja' sequel confirmed; release date soon?

Web Summary : Vijay Sethupathi confirms 'Maharaja 2' after the first film's massive success. Director Nithilan Saminathan has completed the script. Release date is awaited for the sequel to the hit suspense thriller.