"कृती शेट्टीसोबत मी रोमान्स करणार नाही", विजय सेथुपतीचा मोठा निर्णय! कारण ऐकून कराल कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2024 14:05 IST2024-06-06T13:56:05+5:302024-06-06T14:05:49+5:30
विजयने अभिनेत्री कृती शेट्टीसोबत सिनेमात रोमान्स करण्यासाठी नकार कळवला आहे. कारण ऐकून तुम्ही कराल त्याचं कौतुक (vijay sethupati)

"कृती शेट्टीसोबत मी रोमान्स करणार नाही", विजय सेथुपतीचा मोठा निर्णय! कारण ऐकून कराल कौतुक
अभिनेता विजय सेथुपती हा दाक्षिणात्य मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता. विजयने आजवर विविध सिनेमांमधून अभिनेता म्हणून मनोरंजन विश्वावर राज्य केलंय. विजयचं ऑफ कॅमेरा साधं राहणीमान अनेकांना भावतं. विजय लवकरच आगामी 'महाराजा' सिनेमातून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान एका मुलाखतीदरम्यान विजयने अभिनेत्री कृती शेट्टीसोबत रोमान्स करायला नकार दिल्याचा खुलासा केलाय. त्यामागचं कारण ऐकून अनेकांनी विजयचं कौतुक केलंय.
विजयने कृती शेट्टीसोबत रोमान्स करायला दिला नकार कारण..
विजयने एका मुलाखतीत याविषयीचा किस्सा सांगितला. जेव्हा त्याने अभिनेत्री कृती शेट्टीसोबत काम करण्यास नकार दिला. विजयने खुलासा केला की, "डीएसपी चित्रपटात कृतीसोबत काम करण्याची ऑफर मी नाकारली होती. मी 'अपेन्ना' (2021) चित्रपटामध्ये तिच्या वडिलांची भूमिका साकारली होती. या गोष्टीची कदाचित या निर्मात्यांना कल्पना नव्हती. 'उपेन्ना'मधील एका सीनमध्ये कृती खूप घाबरली होती. मी तुझा खरा बाप आहे असं समजून सीन कर असं मी कृतीला सांगितलं होतं. ती माझ्या मुलापेक्षा वयाने थोडीशीच मोठी आहे. त्यामुळे डीएसपीच्या निर्मात्यांना मी कृतीसोबत रोमान्स करणार नाही, यासाठी स्पष्ट नकार दिला."
Vijay sethupathi 👑 pic.twitter.com/uMJFCYJgnu
— m. (@Rashmalaii) June 3, 2024
विजयने स्पष्टपणे नकार दिल्यावर 'डीएसपी'मध्ये विजय सेतुपतीसोबत अभिनेत्री अनुकृती वासला कास्ट करण्यात आले. तिने या चित्रपटात विजयच्या पत्नीची भूमिका केली होती. यापुर्वीही विजयने कृती शेट्टीसोबत रोमँटिक भूमिका करण्यास स्पष्ट नकार दिल्याबद्दल सांगितले होते. अशाप्रकारे स्वतःच्या आणि हिरोईनच्या वयाचा विचार करणाऱ्या कमी कलाकारांपैकी एक विजय सेथुपती म्हणता येईल.