'महाराजा'नंतर विजय सेतुपतीचा आणखी एक धमाका, नव्या चित्रपटाची खर्चाच्या चौपट कमाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 13:16 IST2025-09-03T13:15:49+5:302025-09-03T13:16:16+5:30

'या' चित्रपटानं बॉक्स ऑफिस गाजवलं, आता ओटीटीवरही घातलाय धुमाकूळ, कधी आणि कुठे पाहता येईल?

Vijay Sethupathi And Nithya Menen Thalaivan Thalaivii Trending No 1 On Ott | 'महाराजा'नंतर विजय सेतुपतीचा आणखी एक धमाका, नव्या चित्रपटाची खर्चाच्या चौपट कमाई

'महाराजा'नंतर विजय सेतुपतीचा आणखी एक धमाका, नव्या चित्रपटाची खर्चाच्या चौपट कमाई

सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर एकापेक्षा एक सरस चित्रपट आणि वेब सीरिज येत आहेत, ज्यामुळे प्रेक्षकांना मनोरंजनाचा भरपूर खुराक मिळत आहे. सस्पेन्स, थ्रिलर आणि अ‍ॅक्शन चित्रपटांचा विचार केल्यास, दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टी नेहमीच आघाडीवर असतात. म्हणूनच, सध्या ओटीटीवर दाक्षिणात्य चित्रपटांची क्रेझ मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. असाच एक चित्रपट आला आहे, ज्याची कथा तुम्हाला खिळवून ठेवेल. विजय सेतुपती आणि नित्या मेनन यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाची कथा आणि अभिनयाची खूप प्रशंसा होत आहे.

विजय सेतुपती आणि नित्या मेनन यांच्या 'Thalaivan Thalaivii' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आणि ओटीटीवरही धुमाकूळ घातलाय. फक्त २५ कोटी रुपयांच्या  बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने जगभरात १०० कोटी रुपयांची कमाई केली. म्हणजेच, चित्रपटाने आपल्या खर्चाच्या चौपट कमाई केलीय.

ही कथा कमी शिकलेल्या हॉटेल मालक 'अगसवीरन' (विजय सेतुपती) आणि 'पेरारसी' (नित्या मेनन) यांच्याबद्दल आहे. कुटुंबाच्या संमतीने त्यांचे लग्न होते. सुरुवातीला त्यांच्यात प्रेम असतं. पण, लवकरच त्यांच्यात मतभेद आणि तणाव निर्माण होतो. वाद वाढल्याने पेरारसी तिच्या माहेरी परत जाते, ज्यामुळे दोन्ही कुटुंबांमध्ये अधिक वाद होतात. या चित्रपटात  पती-पत्नीच्या नात्यातील चढ-उतार अतिशय सुंदरपणे दाखवले आहेत.
 

१ ऑगस्ट २०२५ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांना आकर्षित केलं.  २२ ऑगस्ट २०२५ रोजी अमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित झाल्यानंतर 'थलाईवी' टॉप १० चित्रपटांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. हा चित्रपट हिंदीमध्येही उपलब्ध आहे, ज्यामुळे तो अधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचत आहे आणि देशभरातील प्रेक्षकांना आकर्षित करत आहे.
 

Web Title: Vijay Sethupathi And Nithya Menen Thalaivan Thalaivii Trending No 1 On Ott

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.