लोकांकडून नावाजलेला, विजय सेथुपतीच्या अभिनयाने गाजलेला 'महाराजा' येणार OTT वर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2024 13:42 IST2024-07-08T13:42:49+5:302024-07-08T13:42:49+5:30

विजय सेथुपतीचा आगामी 'महाराजा' सिनेमा ओटीटीवर येणार असून तुम्ही या ठिकाणी पाहू शकता (maharaja)

vijay sethipati Maharaja movie is coming to Netflix on 12th July in hindi | लोकांकडून नावाजलेला, विजय सेथुपतीच्या अभिनयाने गाजलेला 'महाराजा' येणार OTT वर

लोकांकडून नावाजलेला, विजय सेथुपतीच्या अभिनयाने गाजलेला 'महाराजा' येणार OTT वर

विजय सेथुपती हा भारतीय मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता. विजय सेथुपतीने दाक्षिणात्य सिनेमात अभिनय केला आहेच शिवाय 'जवान', 'मेरी ख्रिसमस' अशा बॉलिवूड सिनेमांमध्येही काम करुन त्याने लोकांच्या मनावर छाप पाडलीय. विजय सेथुपतीच्या काहीच दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या सिनेमाची चांगलीच चर्चा रंगली. या सिनेमाचं नाव 'महाराजा'. या सिनेमाचा विषय आणि सिनेमातील विजय सेथुपतीच्या अभिनयाचं कौतुक झालं. आता हा सिनेमा लोकांना ओटीटीवर घरबसल्या पाहता येणार आहे.

या ओटीटीवर 'महाराजा' होणार रिलीज

'महाराजा' सिनेमाच्या ओटीटी रिलीजची माहिती सोशल मीडियावर समोर आली आहे. हा सिनेमा १२ जुलै २०२४ रोजी OTT प्लॅटफॉर्म Netflix वर रिलीज होणार आहे. नेटफ्लिक्सने या सिनेमाचे डिजिटल अधिकार मोठ्या रकमेत विकत घेतल्याचे वृत्त आहे. अधिकृत घोषणा करताना नेटफ्लिक्सने सांगितले की, हा सिनेमा १२ जुलै रोजी प्रेक्षकांचे मनोरंजन करेल. १४ जून २०२४ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झालेला हा सिनेमा आता नेटफ्लिक्सवर OTT प्रीमियरसाठी सज्ज झाला आहे.

'महाराजा' सिनेमाविषयी

विजय सेथुपतीच्या 'महाराजा' सिनेमात विजयने महाराजा या व्यक्तीची भूमिका साकारलीय. महाराजा हा पेशाने न्हावी असतो. महाराजाला लक्ष्मीचा शोध आहे. ही लक्ष्मी नेमकी कोण आहे, याचा उलगडा सिनेमा पाहून होईल. 'महाराजा' सिनेमा अनुराग कश्यपने सुद्धा महत्वाची भूमिका साकारलीय.

सिनेमात अनुराग आणि विजय यांच्यात संघर्ष पाहायला मिळतो. अनुराग या सिनेमाच्या निमित्ताने दाक्षिणात्य सिनेसृष्टीत खलनायक म्हणून समोर आलाय. विजयचा खूनशी अंदाजही सर्वांच्या काळजाचा थरकाप उडवतो. अशाप्रकारे भन्नाट कहाणी असलेला 'महाराजा' सिनेमा १२ जुलैपासून नेटफ्लिक्सवर बघायला मिळेल.

 

 

Web Title: vijay sethipati Maharaja movie is coming to Netflix on 12th July in hindi