विजय-रश्मिकाने घेतली पीएम मोदी अन् अमित शाहांची भेट; रिसेप्शनला येण्याचे दिले निमंत्रण
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 14:34 IST2026-02-27T14:33:43+5:302026-02-27T14:34:06+5:30
विजय आणि रश्मिकाने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याचे फोटो समोर आले आहेत.

विजय-रश्मिकाने घेतली पीएम मोदी अन् अमित शाहांची भेट; रिसेप्शनला येण्याचे दिले निमंत्रण
Vijay Deverakonda Rashmika Mandanna : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील बहुचर्चित जोडी विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना अखेर विवाहबंधनात अडकले आहेत. २६ फेब्रुवारी रोजी राजस्थानच्या उदयपूरमध्ये या जोडीचा शाही विवाह सोहळा पार पडला. लग्नाच्या विधींनंतर आता सर्वांचे लक्ष या जोडीच्या भव्य रिसेप्शनकडे लागले आहे. अशातच विजय आणि रश्मिकाने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याचे फोटो समोर आले आहेत.
सोशल मीडियावर समोर आलेल्या फोटोंमध्ये हे जोडपे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेताना दिसत आहे. त्यानंतर या जोडीने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचीही भेट घेतली. मिळालेल्या माहितीनुसार, ही भेट लग्नानंतरची नसून रश्मिका आणि विजयने लग्नापूर्वीच दिल्लीत जाऊन या दोन्ही दिग्गज नेत्यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी अतिशय साध्या वेशभूषेत या नेत्यांची भेट घेऊन त्यांना उदयपूरमधील लग्न आणि हैदराबादमधील रिसेप्शनचे अधिकृत निमंत्रण दिले होते. रश्मिकाने यावेळी पिवळ्या रंगाचा साधा सूट तर विजयने पांढऱ्या रंगाचा इंडो-वेस्टर्न पोशाख परिधान केला होता. या खास भेटीची दखल घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या जोडीला लग्नानिमित्त शुभेच्छा पत्र पाठवून आशीर्वाद दिले होते.
हैदराबादमध्ये ग्रँड रिसेप्शन
उदयपूरमधील 'आयटीसी मेमेंटोज' या आलिशान रिसॉर्टवर लग्नाच्या विधींना मंगळवार, २४ फेब्रुवारी रोजी क्रिकेट सामना आणि संगीत समारंभाने सुरुवात झाली. त्यानंतर बुधवार, २५ फेब्रुवारी रोजी हळदी आणि मेहंदी समारंभ झाला. अखेर २६ फेब्रुवारी रोजी सकाळी तेलुगू आणि संध्याकाळी कोडावा अशा दोन परंपरांमध्ये या जोडीने लग्नगाठ बांधली. हे लग्न अत्यंत खाजगी स्वरूपाचे होते. अत्यंत साध्या पद्धतीनं, शांततेत हा विवाह सोहळा पार पडला. आता लग्नानंतर विजय आणि रश्मिका हैदराबादमध्ये ४ मार्च रोजी ग्रँड रिसेप्शन देणार आहेत.