लग्नानंतर विजयने साजरा केला रश्मिका मंदानाचा पहिला वाढदिवस; वडिलांनी लेकीला दिलं 'हे' खास गिफ्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2026 10:48 IST2026-04-10T10:48:00+5:302026-04-10T10:48:53+5:30

 'नॅशनल क्रश' रश्मिका मंदानाने नुकताच आपला ३० वा वाढदिवस अत्यंत उत्साहात साजरा केला. या विशेष प्रसंगी रश्मिकाच्या वडिलांनी तिला एक अतिशय महागडी आणि मौल्यवान भेट दिली आहे

Vijay deverakonda celebrated Rashmika Mandanna's first birthday after marriage father gifts bunglow | लग्नानंतर विजयने साजरा केला रश्मिका मंदानाचा पहिला वाढदिवस; वडिलांनी लेकीला दिलं 'हे' खास गिफ्ट

लग्नानंतर विजयने साजरा केला रश्मिका मंदानाचा पहिला वाढदिवस; वडिलांनी लेकीला दिलं 'हे' खास गिफ्ट

 'नॅशनल क्रश' रश्मिका मंदानाने नुकताच आपला ३० वा वाढदिवस अत्यंत उत्साहात साजरा केला. लग्नानंतर रश्मिकाचा हा पहिलाच वाढदिवस. रश्मिकासाठी हा वाढदिवस अविस्मरणीय ठरला आहे. या विशेष प्रसंगी रश्मिकाच्या वडिलांनी तिला एक अतिशय महागडी आणि मौल्यवान भेट दिली आहे. रश्मिकाला तिच्या वडिलांकडून 'सेरेनिटी' (Serenity) नावाचा एक आलिशान बंगला भेट म्हणून मिळाला आहे. रश्मिकाने या नवीन घराचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करुन ही बातमी सर्वांना दिली.

वाढदिवसाच्या या सोहळ्यात रश्मिकाचा पती आणि अभिनेता विजय देवरकोंडा देखील तिच्यासोबत दिसला. रश्मिकाने विजयसोबतचे काही खास फोटो शेअर करत एक भावुक नोटही लिहिली आहे. नवीन घरात प्रवेश करताना या जोडप्याने मोठ्यांचे आशीर्वाद घेतले. रश्मिकाने आपल्या पोस्टमध्ये नमूद केले की, वडिलांकडून मिळालेली ही भेट केवळ एक मालमत्ता नसून त्यांच्या प्रेमाचे प्रतीक आहे. तिने आपल्या आयुष्यातील या नवीन टप्प्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली असून विजय देवरकोंडाचेही आभार मानले आहेत.


वाढदिवसाच्या या फोटोत दिसतं की रश्मिका सासू-सासरे आणि आई-वडिलांसह वेळ घालवतेय. या खास प्रसंगी तिचे मित्र-मैत्रिणीही आलेले दिसत आहेत. इतकंच नव्हे रश्मिकाने तिच्या शाळेला भेट दिली असून तिच्या जुन्या मैत्रिणी रश्मिकाचा वाढदिवस करायला उपस्थित होत्या. 

सोशल मीडियावर रश्मिका आणि विजयच्या फोटो व्हायरल होताच चाहत्यांनी या जोडीवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. 'पुष्पा' फेम अभिनेत्रीने आपल्या मेहनतीने चित्रपटसृष्टीत जे स्थान निर्माण केले आहे, त्यामागे तिची अथक मेहनत आहे. रश्मिकाच्या या नवीन घराचे नाव 'सेरेनिटी' तिच्या शांत आणि संयमी स्वभावाशी जुळणारे असल्याचे अनेकांनी म्हटले आहे. सध्या दाक्षिणात्य सिनेसृष्टीत रश्मिकाच्या वडिलांनी दिलेल्या या आलिशान गिफ्टची आणि रश्मिका-विजयच्या केमिस्ट्रीची जोरदार चर्चा रंगली आहे.

Web Title : विजय ने रश्मिका मंदाना का जन्मदिन मनाया; पिता ने दिया आलीशान घर

Web Summary : विजय देवरकोंडा ने रश्मिका मंदाना का 30वां जन्मदिन मनाया। उनके पिता ने उन्हें 'सेरेनिटी' नामक एक आलीशान बंगला उपहार में दिया। रश्मिका ने सोशल मीडिया पर तस्वीरें साझा करते हुए अपने पिता के उपहार के लिए आभार व्यक्त किया। प्रशंसकों ने इस जोड़े को शुभकामनाएं दीं।

Web Title : Vijay Celebrates Rashmika Mandanna's Birthday; Father Gifts Luxurious House

Web Summary : Rashmika Mandanna celebrated her 30th birthday with Vijay Deverakonda. Her father gifted her a luxurious bungalow named 'Serenity'. Rashmika shared photos on social media, expressing gratitude and love for her father's gift. The couple received blessings in their new home, with fans showering the couple with wishes.