पहिला सीन डोकं चक्रावणारा, क्लायमॅक्स पाहून बसेल झटका! OTT वरील 'हा' सिनेमा नाही पाहिला तर काय पाहिलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 16:02 IST2025-09-10T15:55:06+5:302025-09-10T16:02:06+5:30

पहिला सीन डोकं चक्रावणारा, क्लायमॅक्स पाहून बसेल झटका! OTT वर ' हा' सिनेमा आहे ट्रेंडिंग

vijay antony starrer tamil crime thriller film maargan trending on ott platform have you watch it | पहिला सीन डोकं चक्रावणारा, क्लायमॅक्स पाहून बसेल झटका! OTT वरील 'हा' सिनेमा नाही पाहिला तर काय पाहिलं?

पहिला सीन डोकं चक्रावणारा, क्लायमॅक्स पाहून बसेल झटका! OTT वरील 'हा' सिनेमा नाही पाहिला तर काय पाहिलं?

OTT Movies: गेल्या वर्षांमध्ये ओटीटी माध्यमावर वेबसीरीज, सिनेमे पाहण्याऱ्या प्रेक्षकांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. या प्लॅटफॉर्मवर जगभरातील वेगवेगळ्या शैलीचे, भाषेतील चित्रपच उपलब्ध असतात. दर आठवड्याला टीटी प्लॅटफॉर्मवर नवीन चित्रपट प्रदर्शित होतात. पण आजकाल एक चित्रपट त्याच्या दमदार कथेमुळे खूप चर्चेत आहे. इतकंच नाहीतर ओटीटीवर प्रदर्शित होताच हा चित्रपट ट्रेंडिग आहे. या चित्रपटाचं नाव मार्गन आहे.  

मॉर्गन हा एक तमिळ क्राइम थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटात विजय अँटनी, अजय धीशन, समुथिरकानी, ब्रिगिडा, दीपशिखा, महानथी शंकर आणि विनोद सागर हेदेखील प्रमुख भूमिकांमध्ये आहेत. दरम्यान,मार्गन चित्रपटात मुंबई पोलीस अधिकारी ध्रुवची कथा दाखवण्यात आली आहे. याचा क्लायमॅक्स पाहिल्यानंतर डोकं चक्रावून जाईल. त्यामुळे कोणाही हा संपूर्ण चित्रपट पाहण्यापासून स्वतःला रोखू शकणार नाही. 

अशी आहे सिनेमाची कथा

'मार्गन'चित्रपटाच्या सुरुवातीला एका मुलीची विचित्र पद्धतीने हत्या केली जाते. या मागे एका सिरीअल किलरचा हात असतो. परंतु, त्या मुलींनी ज्या पद्धतीने मारलं जातं ते खूप धक्कादायक आहे. कोणताही पुरावा नं सोडता अतिशल चलाखीने हा किलर खून करत असतो. याच प्रकरणाचा छडा कॉन्स्टेबल ध्रुव लावतो. पण, शेवटी तो या सिरिअर किलरला पकडतो की नाही हे पाहणं खूप इंट्रेस्टिंग आहे. 'मार्गन'हा चित्रपट सध्या  'Amazon प्राईम व्हिडीओ' वर उपलब्ध आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांना घरबसल्या चित्रपट पाहता येणार आहे. 

Web Title: vijay antony starrer tamil crime thriller film maargan trending on ott platform have you watch it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.