२०२५ सालचा सर्वात लोकप्रिय चित्रपट, रजनीकांत आणि एस.एस. राजामौलींनी केलंय कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 17:21 IST2025-06-09T17:20:45+5:302025-06-09T17:21:07+5:30

या चित्रपटाने प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. आता ओटीटीवरही कब्जा केलाय.

Tourist Family Ott Release 5th Highest Grossing Tamil Film Trending On Ott Jiohotstar Watch Here | २०२५ सालचा सर्वात लोकप्रिय चित्रपट, रजनीकांत आणि एस.एस. राजामौलींनी केलंय कौतुक

२०२५ सालचा सर्वात लोकप्रिय चित्रपट, रजनीकांत आणि एस.एस. राजामौलींनी केलंय कौतुक

OTT Most Trending Blockbuster Movie: तुम्हाला ओटीटीवर चित्रपट, वेब सीरिज व शो पाहायला आवडत असतील तर एक चित्रपट अजिबात चुकवू नका. सध्या हा चित्रपट ओटीटीवर ट्रेंड करतोय. विशेष म्हणजे या चित्रपटाचं सुपरस्टार रजनीकांत आणि लोकप्रिय दिग्दर्शक एस.एस. राजामौली यांनी कौतुक केलंय. या चित्रपटाने प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. आता ओटीटीवरही कब्जा केलाय.  या चित्रपटाची कथा पाहून तुमचं डोकं चक्रावेल. सुरुवातीच्या क्षणापासून ते क्लायमॅक्सपर्यंत हा चित्रपट तुम्हाला खुर्चीला खिळवून ठेवतो.

एका कमी बजेटच्या तमिळ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलाच नाही तर तो आता ओटीटीवरही पहिल्या क्रमांकावर ट्रेंडिंग करत आहे. १६ कोटींच्या बजेटमध्ये बनवलेल्या या चित्रपटाने ८४ कोटींची कमाई केली. इंडस्ट्री ट्रॅकर सॅकनिल्कच्या मते, हा २०२५ चा सर्वाधिक कमाई करणारा पाचवा तमिळ चित्रपट ठरला. विशेष म्हणजे त्याला ८.५/१० आयएमडीबी रेटिंग मिळालं आहे. हृदयस्पर्शी कहाणी आणि उत्तम अभिनयाने सर्वांचे मन जिंकली आहेत. तर तो चित्रपट आहे, 'टूरिस्ट फॅमिली'. हा चित्रपट  २ जून २०२५ पासून जिओ हॉटस्टारवर स्ट्रीम झाला आहे.

 एस.एस. राजामौली यांनी पहिल्यांदाचं एखाद्या चित्रपटाचं उघडपणे कौतुक केलं आहे. त्यांनी ट्विटरवर चित्रपटाबद्दल लिहिलं की, "एक उत्तम, उत्तम चित्रपट 'टूरिस्ट फॅमिली' पाहिला. हृदयस्पर्शी आणि गुदगुल्या करणाऱ्या विनोदाने भरलेला. त्याने मला सुरुवातीपासून शेवटपर्यंत खिळवून ठेवलं. अभिषेण जीवित यांचे उत्कृष्ट लेखन आणि दिग्दर्शन केलंय. अलिकडच्या काळात सर्वोत्तम सिनेमॅटिक अनुभवाबद्दल धन्यवाद. हा चित्रपट चुकवू नका", या शब्दात त्यांनी चित्रपटाबद्दल कौतुक केलं. 

Web Title: Tourist Family Ott Release 5th Highest Grossing Tamil Film Trending On Ott Jiohotstar Watch Here

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.